शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

पुरवठा अधिकाºयाकडून गोजीच्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:36 IST

शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांतील धान्याचा पुरवठा करण्याकरिता असलेल्या गोजी येथील स्वस्त धान्य दुकानाचा मालक धान्याचा काळा बाजार करीत असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देधान्य वितरणात आढळल्या अनियमितता : परवाना रद्द करण्याची मागणी ं

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांतील धान्याचा पुरवठा करण्याकरिता असलेल्या गोजी येथील स्वस्त धान्य दुकानाचा मालक धान्याचा काळा बाजार करीत असल्याचे समोर आले. मंगळवारी जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी दुकानाला भेट दिली असता तेथे कमालीची अनियमितता दिसून आली. यावरून सदर दुकान मालकाला येत्या शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) रोजी जिल्हा पुरवठा कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.गोजी येथे मारोती दादाजी ओंकार याच्याकडे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देण्यात आला आहे. या दुकानातून गरजूंना धान्य वितरित करण्याऐवजी त्याच्याकडून धान्याचा काळाबाजार होत असल्याची ओरड होत होती. मागील दोन महिन्यांपासून गावातील लाभार्थ्यांना धान्य मिळाले नाही. एपीएल, बीपीएल धारक तथा शेतकºयांना सातबाºयावर मिळत असलेले धान्य प्रत्येक वेळी काही अडचणी पाहून ग्राहकाची दिशाभूल करून धान्य देत नाही. उर्वरित धान्य बाजारात नेऊन विकतो. या दुकान मालकाबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसील कार्यालयात तक्रारी केल्यात; पण त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. याबाबत ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा अधीक्षक अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात आली. यानंतर १३ नोव्हेंबरला तहसीलदार तोडसाम यांनी गोजी गाव गाठले. यावेळी ओंकारचे स्वस्त धान्य दुकान बंद होते आणि तो देखील घरी नव्हता. दुकानाच्या फलकावर सोमवारी दुकान बंद राहील, असे लिहीले होते. यामुळे तोडसाम यांनी ‘मी उद्याला येऊन दुकानाला सिल लावेल आणि तक्रार करणाºया ग्राहकाचे बयाण घेऊन कार्यवाही करू’ असे सांगितले. या आश्वासनानुसार सर्वच गावकरी ग्रा.पं. कार्यालयात हजर झाले. दुपार झाली; पण कोणताही अधिकारी आला नाही.परिणामी, ग्रामस्थांनी थेट जिल्हा पुरवठा अधिकाºयांचे कार्यालय गाठले. यावर जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी गाव गाठत दुकानाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे दिसून आले. यावरून जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी पत्र काढून तहसील कार्यालयात रवाना केले. सदर पत्र या दुकानमालकाला देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी गावाकºयांनी सदर दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा. ग्रामपंचायतच्या शॉपींग कॉम्प्लेक्सच्या खोलीतून धान्य विकण्यात यावे. यामुळे धान्याची अफरातफर होणार नाही. हे कंट्रोल दुसºया कोणत्याही नागरिकाला नियमानुसार देण्यात यावे, अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली.पुरवठा अधिकाºयांना निवेदन देताना मिलिंद भेंडे, अवतार ढगे, आशिया पठाण, रमला मसराम, गोविंद देवतळे, राजेंद्र वरघणे, संतोष जांभुळे, संभाजी पेटकर, पांडुरंग साखरकर, ज्ञानेश्वर राऊत, संजय निकुड, निखील मरस्कोल्हे, हेमंत खांडणेकर, आकाश बावणे, भारत महाजन, राहुल मरस्कोल्हे आदी उपस्थित होते.