शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

नागझरीसह बेलगाव शिवारात ‘हुमनी’ अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 23:33 IST

तालुक्यातील नागझरी व बेलगाव शेत शिवारातील सोयाबीन व तूर पिकांवर सध्या हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतातील सोयाबीन व तूर पीक मुळासह उलथावून लावले जात आहे.

ठळक मुद्देतूर व सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर : कृषी तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील नागझरी व बेलगाव शेत शिवारातील सोयाबीन व तूर पिकांवर सध्या हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतातील सोयाबीन व तूर पीक मुळासह उलथावून लावले जात आहे. सदर बाब काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक अस्मिता मेसरे व प्रियंका आडे यांना सांगितली असता त्यांनी परिसरातील पिकांची पाहणी करून अहवाल तयार करीत तो वरिष्ठांना सादर केला आहे.तालुक्यातील मौजा नागझरी व बेलगाव येथे हुमनी नावाच्या अळीचा सोयाबीन व तूर पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी संपूर्ण झाड उलथावून लावत आहे. आधीच कमी पावसामुळे सोयाबीन पीक संकटात आहे. त्यातच हे संकट शेतकऱ्यांसमोर असल्याने उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देत सोयाबीन व तूर उत्पादक शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता जि.प.चे माजी सदस्य मोहन शिदोडकर व काही शेतकºयांनी याबाबतची माहिती मंडळ कृषी अधिकारी जवळे यांना दुरध्वनीवरुन दिली; त्यावर त्यांनी आपण संपात सहभागी असल्याचे कारण सांगून आपली जबाबदारीच झटकल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. कृषी सहाय्यक मेसरे व आडे यांनी पाहणी केलेल्या शेतात मिनाक्षी शिदोडकर, मोहन राऊत, मंगेश मस्के, गजानन चौधरी, वसंत जगताप, मनोज शेंदरे, ज्ञानेश्वर पाटील, सुनील भागवत, मनोहर भगत व पंकज जीवने आदी शेतकºयांचा समावेश आहे.अळीचे अस्तित्त्व कडूनिंब, बाभुळ व बोरीच्या झाडावरसेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. उंंबरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुमनी अळीचे अस्तित्व कडू निंब, बाभुळ व बोर जातीच्या झाडावर असते. या अळीचे भुंगे जमिनीवर येवून अंडी घालतात. याप्रकारे अंडीतून निघालेल्या अळीचा कुजलेल्या शेणखताचे माध्यमातून शेतापर्यंत प्रवास असतो. या अळीचा वेळीच नायनाट न केल्यास संपूर्ण पीक धोक्यात येण्याची भीती असते.अळीचा प्रादुर्भाव असलेल्या या भागात कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी व तालुका कृषी कार्यालयाचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. हुमनी अळीचा प्रकोप असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित शेतांचे पंचनामे व उपाय-योजना केली जात आहे.- एस. आर. हाडके, तालुका कृषी अधिकारी, देवळी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती