शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर झोपडपट्टीतील चिमुकले विद्यादानाने ‘मोहित’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 05:09 IST

चला गुरुजी आले...गुरुजी मला ड्राईंगची वही द्या... गुरुजी मला पेन्सिल द्या...गुरुजी माझा उद्या पेपर असल्यानं मला हेच शिकवा...असे बोबडे बोल समाजापासून कायम उपेक्षित असलेल्या वर्ध्याच्या इंदिरानगर झोपडपट्टीत दररोज सायंकाळी ऐकायला मिळतो.

- आनंद इंगोलेवर्धा : चला गुरुजी आले...गुरुजी मला ड्राईंगची वही द्या... गुरुजी मला पेन्सिल द्या...गुरुजी माझा उद्या पेपर असल्यानं मला हेच शिकवा...असे बोबडे बोल समाजापासून कायम उपेक्षित असलेल्या वर्ध्याच्या इंदिरानगर झोपडपट्टीत दररोज सायंकाळी ऐकायला मिळतो. झोपडपट्टीतील वंगाळपणा पाहून अनेक जण तिरकस नजरेनं बघत नाक मुरडून निघून जातात. पण, याच झोपडपट्टीतील चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून; त्यांच भविष्य उज्ज्वल करण्यासाठी धडपडणाऱ्या युवकाच्या विद्यादानाने येथील चिमुकले सद्या ‘मोहित’ झाले आहे.आर्वी नाका परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीत वडार समाजबांधवांची वसाहत आहे. या वस्तीतील अनेक जण शिक्षणाच्या गावी गेलेच नसल्याने शिक्षणाचा मार्गही त्यांनी कधी शोधला नाही. त्यामुळे मुलंही दिवसभर बाहेर खेळतात. शाळेत गेले काय किंवा नाही गेले काय, कुणाला सोयरसूतक नाही. यास अपवाद फक्त एखादाच पालक असू शकतो. येथील हे शाळा सोडून दिवसभर रस्त्यानं हिंडणारे, खेळणारे चिमुकले मोहित सहारे या युवकाच्या नजरेस पडले. सर्वसामान्य कुटुंबातील मोहित हे चित्र पाहून थक्क झाला. अज्ञान हा माणसाचा शत्रू आहे, हे ओळखून या चिमुकल्यांची या शत्रुपासून मुक्ती करण्याची खुणगाठ मोहितने मनाशी बांधली. त्यानंतर त्याने या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भवितव्याकरिता झोपडपट्टीतच फुटपाथ स्कूल सुरु केली.स्वत: पॉलीटेक्निक अग्रीकलचरचा विद्यार्थी असलेला मोहित आता गुरुजी बनलाय. चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य देताना बरेचदा मोहितला पदरमोडही करावा लागतो. एकीकडं सरकार अंतराची अट टाकून शाळा बंद करतय तर दुसरीकडं अनेकांनी खासगी शाळांची दुकानदारी उघडली. अनेक सरकारी शाळांत गलेलठ्ठ पगार घेऊनही चिमुकल्याची प्रगती जेमतेम आहे. अशातच झोपडपट्टीत ज्ञानाचा दिवा लावण्याचा मोहीतचा हा प्रयत्न इतरांना पे्ररणा देणारा ठरत आहे.शून्यापासून सुरू झाला प्रवाससुरूवातीला मोहितच्या या फुटपाथ स्कूलमध्ये कुणी विद्यार्थी येत नव्हते. परंतू त्याने आपले प्रयत्न कायम ठेवले. सुरुवातीला पंधरवड्यातून एक दिवस, नंतर आवड्यातून एक दिवस, त्यानंतर चार दिवसातून एक दिवस तर आता शाळेचेही दिवस आणि वेळ वाढू लागल्याने रोजचीच शाळा सुरु झाली. आता मोहित गुरुजी दिसताच चिमुकले पटापट घरून दप्तर घेऊन येतात. झोपडपट्टीतील एका बोळीत चटई टाकून शाळा सुरू होते. दररोज जवळपास ५० चिमुकले दोन ते तीन तास शाळेतील अभ्यासासोबतच पुस्तकातील अभ्यास करतात. हे चित्र पाहून पालकांनाही आनंद होत आहे. तेही आपल्या चिमुकल्याबद्दल आस्थेने विचारपूस करायला लागले आहे.पूर्वी हे चिमुकले अभ्यासापासून दूरच राहायचे. शाळेतून आल्यानंतर अभ्यास केलाच पाहिजे, ही गरजच वाटत नव्हती. पण, आता या चिमुकल्यांना अभ्यासाची सवय लावली. पालकही चिमुकल्यांना या शाळेत पाठवू लागले. ही शाळा सुरू झाल्यानंतर चिमुकल्यांना अक्षरओळख झाली. गणितही येऊ लागले. चिमुकल्यांमध्ये यातून सुधारणाही दिसू लागली. उपेक्षित असलेल्या या समाजामध्ये हा बदल होतांना पाहून मनस्वी आनंद होत आहे.-मोहित सहारे, फुटपाथ शाळेचे गुरुजी.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण