वर्धा : पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर करुन जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालण्यात आले. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून मानधन दरमहा १५ हजार रुपये करावे, पोलीस पाटलांना प्रशिक्षण देण्यात यावे, सेवानिवृत्तीनंतर वृद्धापकाळात निवृत्ती वेतन दिले जावे, पोलीस पाटील भरती पूर्ण करण्यात यावी, पोलीस पाटील भरतीमध्ये पोलीस पाटलांच्या वारसाची नेमणूक व्हावी, पोलीस पाटलांचा विमा शासनाकडून सक्तीचा करण्यात यावा यासह आदी मागण्यांचा समावेश होता.यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यात पोलीस पाटलाचे कामकाज चालू असताना अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसांना अनुकंपाखाली पोलीस पाटीलपदी नेमणूक करावी, पोलीस पाटील कायम करण्यासंदर्भात बैठकी होऊन त्याचा अंतिम निर्णय घेण्याचे ठरले होते, मात्र त्याचा अद्याप निर्णय झालेला नाही, यासह आदी समस्यांवर चर्चा केली.(प्रतिनिधी)
पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2015 01:32 IST