शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पापाच्या गर्भगृहात आयकर विभागाची अद्यापही ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST

आर्वी येथील ‘कदम’ रुग्णालयात झालेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती दिली. याप्रकरणात डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांना अटक करून कारागृहाची हवा दाखविली. आर्वी पोलिसांनी २२ जानेवारी रोजी एका बंद खोलीची झाडाझडती घेतली असता कपाटात तब्बल ९७ लाख ४२ हजार ७४५ रुपये मिळून आले होते. आर्वी पोलिसांनी तत्काळ याची माहिती आयकर विभागाला दिली.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात अनेक रहस्यमय खुलासे झाले. त्यातच पोलीस तपासात बंद खोलीत तब्बल ९७ लाख ४२ हजार ७४५ रुपयांचे घबाड मिळून आले. याबाबत आयकर विभागाला आर्वी पोलिसांकडून पत्र व्यवहारही करण्यात आला. मात्र, या घटनेला तब्बल ८ दिवस उलटूनही आयकर विभागाने पापाच्या गर्भगृहात ‘एन्ट्री’ केली नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. आर्वी येथील ‘कदम’ रुग्णालयात झालेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती दिली. याप्रकरणात डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांना अटक करून कारागृहाची हवा दाखविली. आर्वी पोलिसांनी २२ जानेवारी रोजी एका बंद खोलीची झाडाझडती घेतली असता कपाटात तब्बल ९७ लाख ४२ हजार ७४५ रुपये मिळून आले होते. आर्वी पोलिसांनी तत्काळ याची माहिती आयकर विभागाला दिली. आज आठवडा उलटला तरी आयकर विभाग ‘कदम’ रुग्णालयात दाखल झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आयकर विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ कदम रुग्णालय गाठून डॉ. कदम यांच्या मालमत्तेची तसेच बेनामी मालमत्तेची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

हार्डडिस्क काढण्यासाठी न्यायालयाची घेणार परवानगी-    गर्भपात प्रकरण उजेडात आल्यानंतर आर्वी पोलिसांनी ‘कदम’ रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमधून सोनोग्राफी मशीन जप्त केली होती. यासाठी रेडीओलॉजीस्ट पाचारण करण्यात आला होता. मशीनची तपासणी करुन त्यातील हार्डडिस्क काढण्यासाठी पोलीस न्यायालयातून परवानगी घेणार असल्याची माहिती आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात मागणार पोलीस कोठडी-    गर्भपात प्रकरणात डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आर्वी पोलिसांनी पुन्हा नव्याने दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलीस पुन्हा आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली असून तशी प्रक्रिया पोलिसांनी सुरु केलेली असल्याची माहिती आहे. 

‘ती’ रोकड आर्वी पोलिसांच्या ताब्यात

-   आर्वी पोलिसांनी ‘कदम’ याच्या घरातील बंद खोलीत झाडाझडती घेऊन कपाटात ठेवून असलेल्या लोखंडी पेटीतून ९७ लाख ४२ हजार ७४५ रुपयांची रक्कम जप्त केली. पैसे मोजण्यासाठी तब्बल ९ तासांचा वेळ लागला होता. ही रक्कम मुलीच्या गर्भपात प्रकरणात जप्त केली असल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल