शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप निरीक्षकांनी घेतली झाडाझडती; आमदारांशी ‘वन बाय वन’ चर्चा, अंतर्गत कुरघोडी उघड  

By रवींद्र चांदेकर | Updated: June 22, 2024 16:40 IST

पराभवाची कारणमीमांसा, पदाधिकाऱ्यांची कानउघडणी.

रवींद्र चांदेकर, वर्धा : लोकसभेत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी शनिवारी जिल्ह्यातील पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी ‘वन बाय वन’ चर्चा करून झाडाझडती घेतली. यात पक्षातील अंतर्गत कुरघोडीही उघड झाली.

लोकसभेतील पराभवाची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा शरद पवार गटाच्या नवख्या उमेदवाराने पराभव केला. त्यामुळे हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. सुमारे वर्षभरापासून बूथ बांधणी करूनही पराभव पत्करावा लागल्याने भाजपाचे अंतर्गत नियोजन कोलमडल्याचे उघड झाले आहे. बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि जिल्हा पदाधिकारी लोकसभेच्या परीक्षेत फेल झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने आमदार प्रवीण दटके यांना जिल्ह्यात पाठविले आहे. आमदार दटके यांनी शनिवारी आर्वी मार्गावरील एका ‘पॅलेस’मध्ये आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी ‘वन बाय वन’ चर्चा करून पराभवाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सर्वप्रथम बैठकीत केंद्रात नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार स्थापन झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर आमदार दटके यांनी आमदारांना एक-एक बोलावून चर्चा केली. वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर आणि आर्वीचे दादाराव केचे यांनी त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. 

हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार एका अंत्ययात्रेत असल्याने उशिरा पोहोचले होते. आमदारांनी आपापल्यापरीने पराभवाची कारणे सांगितली. त्यानंतर जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून ‘वन बाय वन’ पराभवाची कारणे जाणून घेण्यात आली. यात काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षातील अंतर्गत नियोजनावर बोट ठेवल्याचे सांगितले जाते. पक्ष निरीक्षक आमदार प्रवीण दटके यांनी चर्चेत पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याचे सांगितले जात आहे. निरीक्षक झाडाझडती घेत असताना पक्षातील अंतर्गत कुरघाेडी उघड झाल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्यात ‘भाजप’चे संघटन मजबूत असताना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. विशेष म्हणजे, अनेक पदाधिकाऱ्यांच्या गावातच पक्षाच्या उमेदवाराला कमी मते मिळाली. खुद्द जिल्हाध्यक्षांच्या गावातही पक्षाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अनेक मंडळ प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुखांच्या गावातही भाजप उमेदवाराला अपेक्षित मते पडली नाही. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. या सर्वांचा आढावा घेण्यासाठीच निरीक्षक म्हणून आमदार प्रवीण दटके यांना जिल्ह्यात पाठविण्यात आले. त्यानुसार त्यांनी आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे सांगितले जाते.

नियोजनशून्यतेचा पक्षाला फटका-

लोकसभा निवडणुकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि लोकसभा प्रमुख यांच्या नियोजनशून्यतेचा फटका बसला. त्यामुळे उमेदवाराचा पराभव झाल्याचे मत एका आमदारांनी पक्ष निरीक्षकांसमोर मांडल्याची माहिती आहे. त्यांच्या या दाव्याने निरीक्षकही आश्चर्यचकीत झाले. काही पदाधिकाऱ्यांनीही पराभवामागील कारणे सांगताना पक्षातील ‘असमन्वया’चा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले जाते. ही चर्चा ‘वन बाय वन’ असल्याने काही पदाधिकाऱ्यांनी अनेक बाबींवर अचूक ‘बोट’ ठेवले. यातून पक्षात सर्व ‘ऑलवेल’ नसल्याचे स्पष्ट झाले.

हिंगणघाट, आर्वीत मतांचा मोठा खड्डा लोकसभा निवडणुकीत भाजपला हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजप २० हजार ५५ मतांनी माघारला. आर्वीतही भाजप उमेदवार १९ हजार ९५५ मतांनी पिछाडीवर राहिले. भाजप उमेदवाराचा गृह मतदारसंघ असलेल्या देवळीत तर ते चक्क तब्बल ३२ हजार २२ मतांनी माघारले. देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असल्याने ही बाब गौण समजली जात आहे. केवळ वर्धा विधानसभेत भाजप उमेदवाराच्या मतांमध्ये केवळ नऊ हजार ६६९ मतांचा अल्पसा खड्डा पडला. या सर्व बाबींचा पक्ष निरीक्षकांनी आढावा घेतला. त्यावरून आता पुढील विधानसभेची ‘रणनीती’ आखली जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा