शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम' विकास आराखड्यात मूळ गाव विकासापासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:11 IST

Wardha : गाव विकासाबाबत उदासीनता, नागरिकांची बैठक घेत मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : सेवाग्राम गाव ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले. सेवाग्राम विकास आराखड्यात अनेक कामे झाली. यात शंका नाही. पण गावाचा उल्लेख असतानाही मूळ गाव मात्र विकासात्मक कामापासून वंचित राहिले. अन्य गावांचा विकास होत आहे; पण याच गावातील समस्यांबाबत आणि विकासाबाबत उदासीनता का? असा प्रश्न आता गावकऱ्यांसमोर आहे

महात्मा गांधींनी देशाच्या विकासाचे गमक गाव विकासात असल्याचे सांगितले होते. त्या नुसार गाव विकास होणे अपेक्षित होते. मात्र ज्यांची कर्मभूमी राहिली त्या महात्मा गांधींच्या गावात अद्यापही सोई-सुविधा उपलब्ध झाल्या नाही. यात रस्त्यावरील दुकानदारांना पर्यायी जागा, पाणंद रस्ते, स्मशानभूमी, देवस्थान, स्वच्छता, नाला, अरुंद पुलामुळे शेतात जाणारे पाणी, जीर्ण जलकुंभ, जिल्हा परिषद शाळेचे मैदान आदी समस्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातही कायम आहे. 

गाव विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्चाचा सेवाग्राम विकास आराखडा राबविण्यात आला. यातून बापूंची कुटी वगळता आजूबाजूचा परिसर, रस्ता, स्ट्रीट लाइटसह अन्य विकासाची कामे करण्यात आली. मात्र मुख्य गाव यातून वगळण्यात आले. बापूंच्या स्वप्नातील गावाची संकल्पना राबविता अली असती मात्र तसे केले नाही. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असे सर्व असतानाही शासकीय यंत्रांना विकास करू शकली नाही. त्यामुळे गावात मूलभूत समस्या अजूनही कायम आहे. यामुळे गाव मागेच राहिल्याचे शल्य आहे. या अनुषंगाने गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाना अणकर, रूपेश कडू. दिलीप शेंद्रे, संजय चव्हाण, सुशील कोल्हे, अभय ताकसांडे, नीलेश तिजारे, संजय देशमुख, मुन्ना शेख, संजय गवई, सुरेंद्र कांबळे, विजय नेहारे, सुधाकर शेंडे, विशाल कांबळे, गजानन ताकसांडे, त्र्यंबक नेहारे इ. सह युवा वर्ग उपस्थित राहून चर्चेत सहभागी झाले. 

वेळप्रसंगी सत्याग्रहाचे उपसणार हत्यारगावातील समस्या मार्गी लावणे प्रमुख काम असून या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी गावातील हनुमान मंदिर देवस्थान येथे रविवारी २० रोजी बैठक पार पडली. यात मेडिकल चौकातील सौंदर्याकरण, स्वच्छतागृह, रस्त्यावरील दुकानदारांना पर्यायी जागा, पाणंद रस्ते, स्मशानभूमी, देवस्थान, स्वच्छता, नाला, अरुंद पुलामुळे शेतात जाणारे पाणी, जीर्ण जलकुंभ, जिल्हा परिषद शाळेचे मैदान इ. विषयांवर चर्चा करीत लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रांना यांच्याशी पत्रव्यवहार मार्गी लावण्यासंदर्भात एकमत झाले. पत्रव्यवहाराने विषय मार्गी न लागल्यास वेळप्रसंगी सत्याग्रहाचे हत्यार उपसणार असल्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. 

 

टॅग्स :wardha-acवर्धा