शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले; शोषणही केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:59 IST

Wardha : यवतमाळमधून आरोपीला केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला यवतमाळ येथून अटक करण्यात आली. पीडितेला फूस लावून पळवून नेत तिचे वारंवार शोषण केल्याचीही धक्कादायक बाब उघडकीस आल्याने आरोपीविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २९ एप्रिल रोजी रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात आली.

रामेश्वर शंकर बावणकर (रा. जवळगाव, जि. यवतमाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, सेलू तालुक्यातील एका गावातील रहिवासी १६ वर्षीय पीडिता तिच्या मोठ्या आईकडे राहण्यास गेली होती. यावेळी आरोपी रामेश्वरने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून जाळ्यात ओढत १ ऑगस्ट २०२२ रोजी फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी पीडितेच्या आईने सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी व पीडितेची गोपनीय माहिती घेतली असता, ते दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील बोरीअरब येथे राहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने बोरीअरब येथे जात शोधमोहीम राबवली असता, आरोपीच्या शेतातील बंड्यात दोघेही सापडले.

दोघांना ताब्यात घेत वर्धा येथे आणून तपास केला असता, आरोपीने पीडितेला स्वतःच्या घरी नेत वारंवार शोषण केल्याचे समजले. पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करून पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीला अटक करून पीडित मुलीला सेलू पोलिसांच्या स्वाधीन केले, पोलिसांनी पीडितेची तपासणी करून तिला पालकांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक भावना धुमाळे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या मार्गदर्शनात निरंजन वरभे, नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख, अक्षय राऊत, गोविंद मुंडे यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी