शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची 'कर्जमुक्ती' नावालाच; 'प्रोत्साहन' ही अजून रखडलेलेच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 16:53 IST

पाच वर्षे उलटली : सव्वा सात हजार शेतकरी लाभापासून वंचितच

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतपिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करू न शकलेल्या तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रोत्साहनपर लाभ योजना अमलात आणली होती. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५४ हजार ९४१ शेतकरी पात्र ठरले. परंतु, १ हजार ४७६ शेतकऱ्यांना अजूनपर्यंत याचा लाभ मिळालेला नाही. कर्जमुक्ती योजना व प्रोत्साहन अनुदानाचे असे सात हजार २५० शेतकरी गत पाच वर्षांपासून दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. 

राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देताना सन २०१९ मध्ये कर्जमाफी घोषित केली. या योजनेसाठी जिल्ह्यात ५८ हजार ८९५ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ५४ हजार ९४१ शेतकरी पात्र ठरले. या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देत ५३ हजार ४६५ शेतकऱ्यांच्या खात्यावरील ४७१ कोटी ३६ लाख रुपये माफ करण्यात आले होते. मात्र, पात्र ठरलेल्या एक हजार ४७६ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही. 

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सुरू केली होती. यासाठी जिल्ह्यात १४ हजार २६४ शेतकऱ्यांनी अर्ज केले. यापैकी ३ हजार ४७५ शेतकरी अपात्र ठरले तर ५ हजार १५ शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभाची २४ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. मात्र, उर्वरित पाच हजार ७७४ शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही. कागदपत्रांचा अभाव तसेच बँक खात्याशी संबंधित अडचणी, आदी कारणांमुळे पाच वर्षे उलटूनही कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळालेला नाही. विद्यमान सरकारचा पाच वर्षांचा कालावधी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये संपुष्टात येणार आहे. निवडणूका जाहीर होण्यापूर्वी या संदर्भात निर्णय घेतील का, याकडे लक्ष लागले आहे. 

काय आहेत अडचणी?राज्य शासनाने पाच वर्षापूर्वी केलेली कर्जमाफी योजना व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेला प्रोत्साहन अनुदानाचा लाभ अजून- पर्यंत मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नाही. तसेच काही शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन झालेले नाही. काही शेतकऱ्यांनी त्रुटींची पूर्तता केलेली नाही. यासह कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचा विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.

प्रोत्साहन योजनेला शासनाकडून गती सन २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केली अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना सुरू केली होती. गत पाच वर्षात बंद असलेल्या या योजनेला उभारी देत ही योजना सुरू करण्यात आली आहे. गत तीन महिन्यांत सात शेतकऱ्यांचे आधार व्हेरिफिकेशन, ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वळती करण्यात आली आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा