शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

निवडणुकीच्या तोंडावर दारूविक्रेत्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

सिंदी पोलिसांनी नागपूर-चंद्र्रपूर मार्गावरील बरबडी गावाजवळ नाकाबंदी करून वाहनासह २ लाख ६५ हजार २०० रुपयांची विदेशी अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी अनिल ऋषी रा. देवडा ता. मूलचेरा जि. गडचिरोली व सुनील लक्ष्मण फरकाडे रा. राळेगाव ता. जि. यवतमाळ यांना अटक केली असून त्यांच्यावर कलम ६५ (अ) ६५ (ई) ७७ (अ) ८३ मदाका अंतर्गत कार्यवाही केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : सिंदी पोलिसांनी नागपूर-चंद्र्रपूर मार्गावरील बरबडी गावाजवळ नाकाबंदी करून वाहनासह २ लाख ६५ हजार २०० रुपयांची विदेशी अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी अनिल ऋषी रा. देवडा ता. मूलचेरा जि. गडचिरोली व सुनील लक्ष्मण फरकाडे रा. राळेगाव ता. जि. यवतमाळ यांना अटक केली असून त्यांच्यावर कलम ६५ (अ) ६५ (ई) ७७ (अ) ८३ मदाका अंतर्गत कार्यवाही केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी चंद्रभान मेघरे यांना वाहनांमध्ये दारू येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून मेघरे यांनी तातडीने त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी पो. ना. प्रकाश मैंद, यांना घेऊन नागपूर-चंद्रपूर मार्गावरील बरबडी गावाजवळ नाकाबंदी करण्यात आली. यावेळी ३२ एए ५६०७ क्रमांकाची टाटा इंडिका विस्टा कार थांबवून गाडीची झडती घेण्यात आली. त्यात गाडीच्या समोरील डॅश बोर्ड व मागील शीट खाली लपवून ठेवलेले विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी दारूसह २ लाख,६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कार्यवाही पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभान मेघरे, प्रकाश मैंद यांनी केले.६८ हजार १०० रुपयांचा दारूसाठा जप्तआगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा होतो. कायदा व सुव्यवस्था बाधीत ठेवण्याकरिता देवळीचे ठाणेदार नितीन लेव्हरकर, यांनी पाऊ ल उचलले. देवळीच्या हद्दीत दारूच्या कारवाई प्रभावी होण्याकरीता सतत गस्त व पेट्रोलिंग वाढविली. वाहन क्रमांक एमएच ३२ डब्ल्यू ३७९३ यावर विदेशी दारूची ४५ बाटल्या ३४ हजार १०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. नाकाबंदीमध्ये एमएच ३२ ए.ए.४९३२ यावर विदेशी दारूची वाहतूक करीत असतांना विदेशी दारूच्या ४८ बाटल्या एकूण ३४ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही कारवाईमध्ये आरोपी उत्कर्ष मून व इतर दोन व्यक्ती सर्व रा.गौरक्षण वॉर्ड देवळी तसेच २ मोहित रामचंद्र गोदवानी, अमोल मिलिंद ब्राह्मणे दोन्ही रा.स्टेशन फैल वर्धा यांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी