शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर हिंदी साहित्यिकांची छाप 

By नरेश डोंगरे | Updated: February 3, 2023 19:44 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर हिंदी साहित्यिकांची छाप पाहायला मिळाली. 

वर्धा : येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी हिंदी साहित्यिकांनी आपले जबरदस्त भाषा आणि वक्तृत्व कौशल्य प्रदर्शित करून अमिट छाप उमटवली. गांधी-बापूच्या भूमीत आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जागर सुरू झाला. देशातील अनेक नामवंत साहित्यिक, कवी आणि गझलकार या संमेलनात सहभागी झाले आहेत. या संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे आणि अन्य मान्यवरांसह डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी तसेच डॉ कुमार विश्वास हे दोन ख्यातनाम हिंदी साहित्यिक सुद्धा हजर होते.

संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अनेकांनी भाषणे केली. मात्र, या उद्घाटन सोहळ्यात हिंदीत भाषण  करणाऱ्या डॉ तिवारी आणि डॉ विश्वास या दोघांची बातच काही और असल्याचे श्रोत्यांनी प्रचंड दाद देऊन अधोरेखित केले.  तिवारी यांनी आपल्या भाषणातून देशात रामायण आणि महाभारत या दोनच भाषा असल्याचे नमूद केले. भाषा आणि शब्द नसते तर जग अंध अपंगा सारखे झाले असते, असेही ते म्हटले. मराठी भाषिक ज्या गर्वाने त्यांच्या भाषेचा गौरव करतात ते माझ्यासाठी आश्चर्यकारक असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर, महादेवी वर्मा आणि अशाच विख्यात साहित्यिकांच्या साहित्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी भाषेचे महत्त्व पटवून दिले. भाषेला लेखक कशा पद्धतीने समृद्ध करतात आणि त्यामुळे भाषेसोबतच व्यक्तीही कसा ऊर्जावान बनतो त्याचाही दाखला त्यांनी दिला. त्यानंतर झालेले कुमार विश्वास यांचेही भाषण कमालीचे भाव खाऊन गेले सर्वांचीच नाराजीकुमार विश्वास यांना आयोजकांनी केवळ पाच मिनिटे दिली, ही बाब उपस्थित साहित्यिक, कवी, गझलकार अन सामान्य श्रोत्यांनाही खटकली. ती अनेकांनी बोलून दाखवली. एकूणच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर सोहळ्याच्या मंचावर तिवारी तसेच विश्वास यांनी हिंदी भाषेतून समृद्ध वक्तव्य करून आपली छाप सोडली. 

 

 

टॅग्स :wardha-acवर्धाMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन