वर्धा : शेतातील मोही आणि बिहाडाची जिवंत झाडे चोरट्यांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता तोडली़ घटना खरांगणा पोलीस स्टेशन हद्दीत रत्नापूर रिट शिवारात घडली. याप्रकरणी आठ आरोपींना खरांगणा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तोडलेला लाकूडफाटा व इतर साहित्यही जप्त करण्यात आले़ गुलाब चिरकुट नेवारे (६५) रा. भादोड (सुकळी) यांच्या मालकीच्या शेतातील एक मोहीचे व बिहाडाची झाडे अशी १८ हजार रुपयांची झाडे परवानगी न घेता विनोद भीमराव आत्राम रा. पानवाडी व सात इसमांनी तोडली. याबाबत शेतकऱ्याच्या तक्रारीवरून खरांगणा पोलिसांनी कलम ३७९ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला़ यात आठही आरोपींना अटक करण्यात आली़ पूढील तपास पोलीस करीत आहेत़(शहर प्रतिनिधी)
अवैध वृक्षतोड; आठ अटकेत
By admin | Updated: January 27, 2015 23:37 IST