लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील कवलेवाडा तसेच इतर रेतीघाटावरुन अवैधरित्या रेतीचा उपसा करुन ट्रॅक्टर व ट्रकव्दारे वाहतूक केली जात आहे. मात्र याकडे महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.कवलेवाडा घाटावरुन रेतीची सर्रासपणे चोरटी वाहतूक सुरू आहे. तर दुसरीकडे घरकुलाची कामे जोरात सुरु आहेत. त्यांनी रेतीची मागणी केली व कागदपत्रे जमा केले असून सुद्धा तहसील कार्यालयातून त्यांना परवानगी मिळत नसल्याची माहिती आहे. पर्यायाने त्यांना चोरीची व महागाची रेती जास्त पैसे देऊन विकत घ्यावी लागत आहे.घरकुलाच्या बांधकामासाठी शासन मोजके रुपये देते, त्यात त्यांना जास्त पैशाने रेती विकत घ्यावी लागत असल्याने बांधकाम खर्चात वाढ होत असल्याने लाभार्थी अडचणीत आले आहे. कवलेवाडा, घाटकुरोडा येथील रेतीघाटावरुन रेतीची ट्रकने वाहतूक होत असल्याने परिसरातील रस्ते पूर्णत खराब झालेले आहेत.घाटकुरोडा ते तुमसरपर्यंतच्या राज्य मार्गापर्यंतचा रस्त्याची रेती वाहून नेणाºया जड वाहनांमुळे दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. याच रस्त्याने शाळकरी मुले, नागरिक पायी, सायकलने ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या परिसरातील रेतीघाटावरुन सुरू असलेल्या रेतीच्या तस्करीला पूर्णपणे लगाम लावून रेतीमाफीयांवर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना सहकार्य करणाºया महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर सुध्दा जिल्हाधिकाºयांनी कारवाई करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.रस्ता दुरूस्ती करा, अन्यथा आंदोलनरेती वाहून नेणाºया वाहनांची पाटीलटोला, घोगरा, मुंडीकोटा, नवेगाव या मार्गावरुन वर्दळ असते. त्यामुळे हा परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अवैध रेती तस्करीला आळा घालून या परिसरातील रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे.सीसीटीव्ही लावण्याची घोषणा हवेतजिल्ह्यातील रेतीघाटावरुन होत असलेल्या रेती तस्करीला आळा घालण्यासाठी रेती घाटाच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी आठ महिन्यांपूर्वी दिले होते.मात्र यानंतरही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही. परिणामी रेतीची अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र आहे.रेतीमाफियांना पाठबळ कुणाचे?तिरोडा तालुक्यात सर्वात मोठा रेतीघाट असून या रेती घाटावरुन होत असलेल्या रेती तस्करीचा प्रकार आता लपून राहिलेला नाही. यासंदर्भात गावकºयांनी महसूल विभाग आणि जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली.मात्र अद्यापही रेतीमाफियांवर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे रेतीमाफीयांना नेमके पाठबळ कुणाचे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रेतीघाटावरुन रेतीचा अवैध उपसा सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST
घरकुलाच्या बांधकामासाठी शासन मोजके रुपये देते, त्यात त्यांना जास्त पैशाने रेती विकत घ्यावी लागत असल्याने बांधकाम खर्चात वाढ होत असल्याने लाभार्थी अडचणीत आले आहे. कवलेवाडा, घाटकुरोडा येथील रेतीघाटावरुन रेतीची ट्रकने वाहतूक होत असल्याने परिसरातील रस्ते पूर्णत खराब झालेले आहेत.
रेतीघाटावरुन रेतीचा अवैध उपसा सुरुच
ठळक मुद्देप्रशासनाची बघ्याची भूमिका : रेती माफियांवर कारवाईची मागणी