वन विभागाची कारवाई : चालकाला घेतले ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन विभागाच्या मालकीच्या झुडपी जंगलातून जेसीबीच्या साह्याने अवैध उत्खनन करून मातीची चोरी केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. यावरून अधिकाºयांनी छापा टाकून जेसीबी जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री मौजा साटोडा शिवारात करण्यात आली.साटोडा शिवारातील सर्वे क्र. १८८ या झुडपी जंगलात जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले जात होते. याबाबत वर्धा विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांना माहिती मिळाली. यावरून अधिकारी व कर्मचाºयांच्या पथकाने घटनास्थळ गाठले असता जेसीबीने अवैध खोदकाम केले जात असल्याचे निदर्शनास आले. अधिकाºयांनी खोदकामासाठी आवश्यक कागदपत्रांची विचारणा केली असता ते आढळून आले नाही. यामुळे जेसीबी चालक सचिन भाऊराव नेहारे याला ताब्यात घेत जेसीबी क्र. एमएच ३२ पी २१५६ किंमत १५ लाख रुपये जप्त करण्यात आला. ही कारवाई वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, भाष्कर इंगळे, श्याम कदम, उमेश शिरपुरकर, अरुण कांढलकर आदींनी केली.विटभट्टीसाठी नेली जात होती मातीवन विभागाने जप्त केलेला जेसीबी सुहास पाटील यांच्या मालकीचा असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाºयांनी दिली. जेसीबीच्या साह्याने झुडपी जंगलातून मातीची चोरी करून ती जंगलाच्या शेजारी असलेल्या शेतात ठेवून विट भट्टीसाठी वापरली जात होती, असे वन विभागाच्या अधिकाºयांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.
झुडपी जंगलात अवैध उत्खनन, जेसीबी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:36 IST
वन विभागाची कारवाई : चालकाला घेतले ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन विभागाच्या मालकीच्या झुडपी जंगलातून जेसीबीच्या साह्याने अवैध उत्खनन करून मातीची चोरी केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. यावरून अधिकाºयांनी छापा टाकून जेसीबी जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री मौजा साटोडा शिवारात करण्यात आली.साटोडा शिवारातील सर्वे क्र. १८८ या ...
झुडपी जंगलात अवैध उत्खनन, जेसीबी जप्त
ठळक मुद्देप्रकाश शाह : सर्व सेवा संघाचे दोन दिवसीय अधिवेशन