शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यातून होतेय रेतीचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:46 IST

परिसरातील पोटी व साती शिवारातील वर्धा नदीपात्रातुन मागील काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून मालवाहूच्या सहाय्याने त्याची वाहतूक ेकेली जात आहे. असे असताना परिसरातील नाल्यांमधूनही रेती माफिया वाळूची चोरी मनमर्जीने चोरी करीत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कमोझरी (शे.) : परिसरातील पोटी व साती शिवारातील वर्धा नदीपात्रातुन मागील काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून मालवाहूच्या सहाय्याने त्याची वाहतूक ेकेली जात आहे. असे असताना परिसरातील नाल्यांमधूनही रेती माफिया वाळूचीचोरी मनमर्जीने चोरी करीत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. त्याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य कारवाई करण्याची मागणी आहे.रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. मोझरी येथील शेतकरी दिनेश काळे यांचे मौजा पोेटी शिवारात आठ एकर शेत आहे. या शेताच्या मधोमधून नाला वाहतो. सध्या तो कोरडा पडला असून याच नाल्यातून सध्या मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जात आहे. हा संपूर्ण प्रकार मनमर्जीने सुरू असताना त्याकडे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाळू माफियांकडून रात्रीच्या सुमारास अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाळूचा साठा ट्रॅक्टरमध्ये लादून ते पांदण रस्त्याने नेली जात असल्याने रस्त्याची दैना झाली आहे. बहूता वाळू माफियांकडून शेतपिकांचे नुकसान केले जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणाची माहिती काही अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र, तेही दुर्लक्ष करीत असल्याने तालुका व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देत वाळू माफियाच्या मनमर्जीला आळा घालण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे. अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे.

टॅग्स :sandवाळूThiefचोर