शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गिरोलीच्या खदाणीतून अवैध उत्खनन

By admin | Updated: May 15, 2015 02:00 IST

नजीकच्या गिरोली (ढगे) येथील गिट्टीखदाण काही वर्षांकरिता लिजवर घेतली आहे़ या खदाणीतून अवैध उत्खनन करण्यात येत आहे़ ..

झडशी : नजीकच्या गिरोली (ढगे) येथील गिट्टीखदाण काही वर्षांकरिता लिजवर घेतली आहे़ या खदाणीतून अवैध उत्खनन करण्यात येत आहे़ शिवाय नियमांना डावलून खोलवर ब्लास्टींग केले जात असल्याने नागरिकांच्या घरांना हादरे बसतात़ महसूल तसेच खनिकर्म विभागाने याकडे लक्ष देत सदर खदाण रद्द करावी, अशी मागणी गिरोली येथील नागरिकांनी केली आहे़खदाणीमध्ये नियमानुसार एक-दीड फुट खोलीवर ब्लास्टींग करणे गरजेचे आहे; पण खदाणधारक तसे न करता पाच-सहा फुट खोलीवर ब्लास्टींग करीत आहे़ यामुळे गावातील घरांना हादरे बसतात़ याबाबत नागरिकांनी हटकले असता अरेरावी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे़ गिट्टी विकायची असली तर संबंधित ग्राहकांकडून रॉयल्टीचे पैसे घेतले जातात; पण शासनाच्या तिजोरीत रॉयल्टी न भरता परस्पर गिट्टीची विक्री केली जाते. इतकेच नव्हे तर खाणधारकांनी सभोवतालच्या टेकड्यांवरील मुरूम विना रॉयल्टी विकणे सुरू केले आहे़ प्रशासनाची कारवाई टाळण्याकरिता शनिवारी दुपारपासून तर रविवारी सायंकाळपर्यंत गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक केली जाते़ या सर्व प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे; पण महसूल विभागातील अधिकारी कुठलीही कारवाई करताना दिसत नाही़ गिट्टी, मुरूम आदी गौण खनिजाची वाहतूक करताना वाहन क्षमतेच्या मापदंडाच्या अधिन राहून वाहतूक करणे गरजेचे असते; पण या गिट्टीखदाणवरून ट्रक ओव्हरलोड वाहतूक केली जाते. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ यास जबाबदार कोण, असा प्रश्नही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत़ वाहतूक नियंत्रण अधिकारीही ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ यापूर्वी गिरोली ग्रा़पं़ ने सदर गिट्टी खदाणीला ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असा ठराव घेतला होता़ यानंतर पुन्हा ना-हरकतीसाठी सभा घेण्यात आली़ शिवाय ग्रामस्थांतही दोन गट असल्याने खाण धारकाचे फावत आहे़ महसूल व खनिकर्म विभागाने यात हस्तक्षेप करून सदर खदाणीची संपूर्ण चौकशी करावी व ग्रामस्थांच्या समस्या सोडवाव्या, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)