शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात वाढत आहेत अवैध बांधकाम, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:22 IST

तक्रारी देऊन कारवाई नाही : अधिकाऱ्यांवर नेमका कोणाचा दबाव?

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरामध्ये नगरपरिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या अनेक प्रभागांमध्ये अवैध बांधकामांना ऊत आलेला आहे. अनेक वेळा या अवैध बांधकामासंदर्भात तक्रार देऊन सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे रहदारीला व शहरातील विकासकामांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अवैध बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हिंगणघाट शहरामध्ये अनेक असे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये घर बांधताना रीतसर नगर परिषदेची परवानगी घेतली जात असते परंतु परवानगी घेतल्यानंतर घर बांधकामाच्या वेळेस घर मालकाची मर्यादित जागेच्या व्यतिरिक्त उरलेल्या काही शिल्लक जागेवर नजर असते. घराचे बांधकाम करीत असताना मोकळ्या जागेत बांधकाम केले जात आहे. त्यामुळे गावातील डेव्हलपमेंट योग्य त्या पद्धतीने होत नाही. सोबतच विकासकामे करते वेळी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. सोबतच घरासमोरील नालीचा भाग अरुंद केला जात आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ काही प्रभागांमध्ये छोटे रस्ते असल्यामुळे समोर घराचे बांधकाम वाढवण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध बांधकामामुळे वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी करण्याची मागणी होत आहे. 

शहरातील कचऱ्याची समस्या कायम शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या घराजवळील नाल्यावर अवैध बांधकाम केले आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला प्रभागांमध्ये नाली साफसफाई करतेवेळी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील नाले साफसफाईची गंभीर समस्या बनली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

तक्रारी देऊनही कारवाई नाही शहरातील होत असलेल्या अवैध बांधकामसंबंधी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना तक्रारी देऊन सुद्धा तक्रारीची दखल घेतली जात नाही. तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करून थंड बस्त्यात टाकण्यात येते. अशा वेळी नागरिकांच्या दबावाखाली कारवाई केलीच तर कुठल्यातरी वरिष्ठ व्यक्तीचा फोन संबंधित विभागाला येतो व अवैध बांधकामाबद्दलची कारवाई थांबविली जाते, असे चित्र शहरात दिसत आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा