शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

प्लॉट बळकावून केले अवैध बांधकाम

By admin | Updated: June 28, 2014 00:35 IST

दुसऱ्याच्या नावे असलेल्या खाली जागेवर बळजबरीने बांधकाम करण्यात आले़ तसेच याबाबत जाब विचारण्यासाठी प्लॉटमालक गेला असता..

वर्धा : दुसऱ्याच्या नावे असलेल्या खाली जागेवर बळजबरीने बांधकाम करण्यात आले़ तसेच याबाबत जाब विचारण्यासाठी प्लॉटमालक गेला असता त्यास जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली़ मुकेश दशरथ मसराम असे प्लॉटधारक तक्रारकर्त्याचे नाव आहे़ याप्रकरणी रमाकांत धुळे याच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले़निवेदनानुसार मुकेश मसराम याने मार्च २०१४ मध्ये पिपरी(मेघे) ग्राम पंचायत कक्षेतील शेत सर्व्हे क्रमांक ३०९ मधील प्लॉट क्रमांक ४/१ चा काही भाग व प्लॉट क्रमांक ३/१ चा काही भाग रजिस्टर्ड विक्रीपत्रान्वये अभय वामन जयसिंगकार यांच्याकडून विकत घेतला़ सदर प्लॉटच्या दक्षिणेस गैरअर्जदार रमाकांत धुळे यांचा प्लॉट व घर आहे़ रमाकांत धुळे व मुकेश मसराम यांचा प्लॉट लागून असून पूर्वी एकच भाग असल्यामुळे त्यांचा ७/१२ एकत्रित आहे़ परंतु मुकेश मसराम यांनी प्लॉट विकत घेतल्यापासून प्लॉटचा मालकी हक्क व ताबा हा त्यांचाच आहे. काही दिवसापूर्वी मसराम यांनी आपल्या प्लॉटवर जाऊन पडताळणी केली असता धुळे याने प्लॉटवर येण्यास मज्जाव करीत अडथळा निर्माण केला आणि पुन्हा इकडे फिरकल्यास बरे होणार नाही अशी धमकी दिली. तसेच आपला मित्र पोलिस कर्मचारी गिरमकर याना फोनद्वारे बोलावून मसरामवर दबाव आणला. मारत नेऊन पोलीस स्टेशनमध्ये बंद करून खोट्या केसमध्ये फसवील अशी धमकीही दिली़ या बाबतची तक्रार मसराम याने ०२ जून २०१४ रोजीच अधीक्षाकांकडे केली आहे. त्यानंतर मसराम हे ३ जून २०१४ रोजी सकाळी प्लॉटवर जावून पाहणी करण्यासाठी गेले असता आपल्या प्लॉटवर गैरअर्जदारानी स्लॅबचे बांधकाम सुरू केल्याचे त्यांना आढळले. यावेळी मसराम सोबत राजेश अण्णाजी इंगोले हेदेखील हजर होते. धुळे यास प्लॉटवर सुरू केलेल्या अवैध बांधकामाबद्दल विचारणा केली असता मारहाण करीत मसराम यास जातीवाचक शिवगाळ केली़ याबाबत ३ जून २०१४ रोजी पोलीस अधीक्षक, पोलिस स्टेशन वर्धा व जिल्हाधिकारी, यांचेकडे लेखी तक्रार दिली. परंतु अद्यापही धुळे याच्यावर कोणतीही कायदेशिर कारवाई झालेली नाही़ त्यामुळे प्लॉटवर बांधकाम सुरूच आहे़ धुळे याच्या वर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे मसराम यांनी केली आहे़(शहर प्रतिनिधी)