शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वीटभट्ट्यांनी श्वास कोंडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 05:00 IST

धुरामुळे फळबागांवरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग, वर्धा, नांदेड महामार्गासाठी अवैध मुरूम चोरी, वाळूचे अवैध उत्खनन कमी झाले असताना अवैध वीट भट्ट्यांनी आता डोके वर काढले आहे. वर्धा तालुक्यात तब्बल ७७ वीटभट्ट्यांच्या आहे. मात्र, यासर्व वीटभट्ट्या विनापरवाना सुरू आहेत. विशेष म्हणजे कारला परिसरात वीटभट्टी चालकांचा त्रास वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी महत्त्वाचे साहित्य असलेल्या विटांच्या भट्ट्यांची संख्या वर्धा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे; पण वीटभट्टी मालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. धुरामुळे फळबागांवरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग, वर्धा, नांदेड महामार्गासाठी अवैध मुरूम चोरी, वाळूचे अवैध उत्खनन कमी झाले असताना अवैध वीट भट्ट्यांनी आता डोके वर काढले आहे. वर्धा तालुक्यात तब्बल ७७ वीटभट्ट्यांच्या आहे. मात्र, यासर्व वीटभट्ट्या विनापरवाना सुरू आहेत. विशेष म्हणजे कारला परिसरात वीटभट्टी चालकांचा त्रास वाढला आहे. समृद्धी महामार्गासाठी झालेल्या मुरूम चोरीत कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला. वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गातही दोन कंत्राटदारावर सुमारे २० कोटींचा दंड आकारला. अवैध वाळूचोरीला राजकीय वरदहस्त असल्याने त्यावर कारवाई झाली नाही. हे सारे असताना आता अवैध वीटभट्ट्यांचाही विषय महत्त्वाचा ठरला आहे.  खरांगणा गोडे येथील ४ वीटभट्टी चालकांनी अनेक वर्षांपूर्वी परवानगी घेतली होती. मात्र, त्याचे नूतनीकरण केले नाही. वीटभट्टीसाठी लागणारी माती शेतातून चोरी केली जाते, तर काही शेतकरी माती विकतात. त्यालाही शासकीय परवानगी आवश्यक असते. प्रदूषणाचे नियमही पाळले जात नाहीत. वीट्टभट्टीवर दारूअड्डा सुरू राहत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांनाही त्रास होतो. वीटभट्टी लावण्यासाठी शेतजमीन अकृषक करणे आवश्यक असताना तेही केली जात नाही. वीटभट्टी चालकांची मनमानी वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. महाकाळ परिसरातील वीटभट्टी चालकांनी तर रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. 

 

टॅग्स :pollutionप्रदूषण