शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

मेघे भाजपवासी झाल्यास देवळीत चुरस

By admin | Updated: June 11, 2014 00:12 IST

देवळी विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा अंमल असला तरी मेघे पिता-पुत्रांनी भाजप प्रवेश केल्यास या मतदार संघातील राजकीय समीकरण बदलाचे संकेत आहेत. भाजप सागर वा समीर यांना या क्षेत्रातून

राजकीय घडामोडींना वेग : भाजपमध्ये दिग्गजांची उमेदवारीसाठी चढाओढराजेश भोजेकर - वर्धादेवळी विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा अंमल असला तरी मेघे पिता-पुत्रांनी भाजप प्रवेश केल्यास या मतदार संघातील राजकीय समीकरण बदलाचे संकेत आहेत. भाजप सागर वा समीर यांना या क्षेत्रातून निवडणूक रिंगणात उतरवून काँग्रेसपुढे कडवे आव्हान उभे करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.पूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभावती राव आणि आता ना. रणजित कांबळे यांच्या रुपाने काँग्रेसचा गड असलेला देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघ राजकीय घडामोडींनी एकाएकी चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय संपादन केल्यामुळे भाजपाच्या दिग्गजांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचाही या क्षेत्रावर डोळा आहे. खा. रामदास तडस हे तेली समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे असल्यामुळे विधानसभा कुणबी समाजाला मिळावी. असे झाल्यास तेली आणि कुणबी समाजाच्या मतांवर ही निवडणूक सहज जिंकता येणे शक्य आहे, असे डॉ. गोडे यांचे गणित आहे. माजी खासदार सुरेश वाघमारे यांना लोकसभा लढवायची होती. मात्र त्यांचा पत्ता कापून तडस यांनी तिकीट मिळवून बाजी मारल्यामुळे आता त्यांना दूरपर्यंत खासदारकीची संधी दिसत नाही. या कारणाने देवळीतून विधानसभा लढण्याच्या हालचाली वाघमारे यांनी सुरू केल्या आहेत. यासोबतच भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष राजेश बकाने आणि तालुकाध्यक्ष मुकेश भिसे हेही आपला दावा करीत आहेत. नेहमी प्रसिद्धीचा हव्यास बाळगून असलेले जि.प. सदस्य मिलिंद भेंडे यांनाही आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. काँग्रेसला रामराम ठोकत अनिवासी काँग्रेस झालेले जेष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे, पुत्र माजी आमदार सागर मेघे आणि समीर मेघे आगामी काळात भाजपवासी होणार आहेत. भाजपात बिनशर्त प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. असे झाल्यास देवळी विधानसभा क्षेत्रातून भाजप सागर वा समीर यांच्यापैकी एकाला निवडणूक रिंगणात उतरवून काँग्रेसपुढे नवे आव्हान उभे करण्याच्या तयारीत भाजप असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत रामदास तडस यांनी गुरु-पुत्राचा पराभव केला असला तरी मेघे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाने पुन्हा गुरु-शिष्याचे नाते घट्ट होण्याचे संकेत असून विधानसभा निवडणुकीत हे गुरु-शिष्य विजयासाठी कंबर कसणार, असाही सूर आहे. असे झाल्यास देवळीत चांगलीच चुरस बघायला मिळेल. दत्ता मेघे बाहेर पडल्याने जिल्ह्यात काँग्रेसमध्ये ना. रणजित कांबळे यांना प्रतिस्पर्धी उरलेला नाही. तेच आता काँग्रेसचे सर्वेसर्वा असतील. काँग्रेसचा देवळी गड राखणे हे त्यांच्यापुढे पहिले आव्हान असेल. लोकसभा निवडणुकीत सागर मेघे यांच्या पराभवाचे खापर ना. रणजित कांबळे आणि आ. सुरेश देशमुख यांच्यावर फोडत भाजपच्या मार्गावर असलेले मेघे पिता-पुत्रांची देवळी आणि वर्धा दोन्ही विधानसभा मतदार संघात महत्त्वाची भूमिका असेल, ते आता जिल्ह्यातून काँग्रेसचा सफाया करण्याच्या बेतात असतील, असा राजकीय सूर असल्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदार संघात राजकीय घमासान बघायला मिळेल, असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत देवळी विधानसभा मतदार संघातून भाजपला तब्बल ८१ हजार ८२२ मते मिळाली, तर काँग्रेसला ५१ हजार २९६ मतांवरच समाधान मानावे लागले. यात ३० हजार ५२६ चे भाजपला मताधिक्य मिळाले आहे. २००९ मध्ये विधानसभा क्षेत्रात २ लाख २५ हजार १२९ मतदार होते, आता ही संख्या २ लाख ४२ हजार ९१७ झाली असून यात १७ हजार ८७७ मतांची भर पडली आहे. यात नव मतदारांचा कल कोणाकडे राहतो, यावर विधानभेचे गणित अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीत एकतर्फी मतदान झाले असले तरी विधानसभा निवडणुकीत हेच चित्र कायम राहील, याबाबत मात्र साशंकता आहे.