शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लम्पी कोपात लसीकरणासाठी गोपालकांचा हंबरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

आठही तालुक्यामध्ये २ लाख ७५ हजार गोवंशीय जनावरे आहेत. त्यापैकी ९ हजार ३७७ जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसिज’ ची बाधा झाली आहे. ज्या परिसरात बाधित जनावरे आहे त्या गावामध्ये तसेच बाधित गावांपासून ५ किलो मीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व म्हैस वर्गीय बाधित जनावरांना वगळता लसीकरण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन खात्याने दिले आहेत. त्यामुळे ९ हजार ३७७ बाधित जनावरे वगळता इतरांना लसीकरण करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २ लाख ७५ गोवंश : ५२ हजार जनावरांना लसीकरण, पशुसंवर्धन विभागाकडे लसीचा तुटवडा?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्ग कोपात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांवर आता गोवंशीय जनावराच्या ‘लम्पी त्वचा आजारा’ चे नवे संकट ओढवले आहे. जिल्ह्यामध्ये ९ हजार ३७७ जनावरांना बाधा झाल्याने उर्वरित जनावरांना तात्काळ प्रतिबंधित लसीकरण गरजेचे असून त्या अनुशंगाने पशुसंवर्धन विभागाने उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. पण, पशुसंवर्धन विभागाकडे लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणात अडचणी येत असल्याची ओरड होत आहे.आठही तालुक्यामध्ये २ लाख ७५ हजार गोवंशीय जनावरे आहेत. त्यापैकी ९ हजार ३७७ जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसिज’ ची बाधा झाली आहे. ज्या परिसरात बाधित जनावरे आहे त्या गावामध्ये तसेच बाधित गावांपासून ५ किलो मीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व म्हैस वर्गीय बाधित जनावरांना वगळता लसीकरण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन खात्याने दिले आहेत. त्यामुळे ९ हजार ३७७ बाधित जनावरे वगळता इतरांना लसीकरण करणे बंधनकारक आहे.पशुसंवर्धन विभागाने खरेदी केलेली ४६ हजार ५००, राज्य शासनाच्या दवाखान्यातील १५ हजार ५०० आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून प्राप्त झालेली २० हजार अशी एकूण ८० हजार ३०० लस उपलब्ध असून आतापर्यंत ५२ हजार १०० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. अद्यापही २ लाख १३ हजार ५२३ जनावरे लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. सध्यातरी पशुसंवर्धन विभागाकडे अपुरा लस साठा असल्याने गोपालकांची लसीकरणासाठी भटकंती करावी लागत आहे.पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाची चालढकल‘लम्पी स्कीन डिसिज’चा प्रकोप वाढायला लागलाच जिल्हा परिषद पशुसवंर्धन विभागा अंतर्गत येणाºया परिसरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य शासनाच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाअंतर्गत येणाºया पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये अद्यापही लसीकरण सुरु झाले नाही. याचा परिणाम खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कांरजा परिसरातच पडल्याने गोपालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयांतर्गत एक जिल्हास्तरी, ५ तालुकास्तरीय तर १५ ग्रामीण दवाखान्यांचा समावेश आहेत. या विभागाने १ लाख रुपयांच्या निधीतून १५ हजार लसी खरेदी केल्या असल्या तरी लसीकरणाकरिता चालढकल केली जात असल्याने आजार बळावण्याची शक्यता आहे.कारंजा तालुक्यात पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाअंतर्गत येणाºया दवाखान्यातून अनेक गावांमध्ये लसीकरण झाले नसल्याचे गोपालकांकडून सांगण्यात आले आहे. लसीकरण न होणे ही गंभीर बाब असून पशुपालकांकरीत जि.प.आवश्यक निर्णय घेईल. उपायुक्त कार्यालयाला काही अडचणी असल्यास त्यांनी सांगाव्या.सरिता गाखरे, अध्यक्ष, जि.प.वर्धागावोगावी शिबिर आयोजित करुन तसेच पथकाव्दारे गावोगावी जाऊन लसीकरण केले जात आहे. नियमित लसीकरण व बाधित जनावरांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात कुठेही लसीचा तुटवडा नाही. हिंगणघाटामध्येही लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.वर्धाजनावरांवर ‘लम्पी स्कीन डिसिज’चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने गोपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आधीच शेतकरी संकटात असताना आता हे नवे संकट ओढवले आहे. त्यामुळे जे जनावरे बाधीत नाही, त्यांना प्रतिबंधक लस देण्यासोबतच बाधित जनावरांवर उपचार करण्यासंदर्भात सोनेगाव (खुनकर) येथे शिबिर घेण्यासंदर्भात स्थानिक पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांना म्हटले असता त्यांनी सध्या लस उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे परिसरातील जनावरांना लसीकरण करता आले नाही. त्यामुळे लसीकरणाचा तुटवडा दूर करण्याची गरज आहे.धनराज तेलंग, सदस्य, जिल्हा परिषद

टॅग्स :Healthआरोग्य