राजेश सोलंकीलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: येथील तहसील कार्यालय परिसरात पहाटे दोन ते अडीच वाजता अचानक लागलेल्या आगीने ट्रेझरी कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय नायब तहसीलदार कार्यालय आणि रेकॉर्ड रूम जळून खाक झाली. संजय गांधी निराधार योजनेतील काही रेकॉर्ड वाचविण्यात यश आले. रात्री दोन ते अडीचच्या सुमारास ही आग लागली. तीन वाजता पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेले राहुल देशमुख यांना ट्रेझरी कार्यालयातून धुळीचे लोट दिसले असता त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तेथे पोलीस ड्युटीवर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन केले घटनास्थळी नगरपालिका अग्नीशमन गाडी ने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे आष्टी आणि पुलगाव येथून अग्निशमन यंत्रणेला पाचारण करावे लागले. सतत दोन ते अडीच तास आग विझविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके तहसीलदार विद्यासागर चव्हाण ठाणेदार संजय गायकवाड नगराध्यक्ष प्रशांत सवालाखे उपमुख्य अधिकारी रणजित पवार साकेत राऊत पोहोचले. पोलीस स्टेशन कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी महसूल कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तहसील कार्यालय परिसरात भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 06:47 IST
वर्धा येथील तहसील कार्यालय परिसरात पहाटे दोन ते अडीच वाजता अचानक लागलेल्या आगीने ट्रेझरी कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय नायब तहसीलदार कार्यालय आणि रेकॉर्ड रूम जळून खाक झाली.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तहसील कार्यालय परिसरात भीषण आग
ठळक मुद्देट्रेझरी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, नायब तहसील कार्यालय, आणि रेकॉर्ड रूम जळून खाक