वर्धा : मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास २०२४-२५ करिता १६० कोटींचे टार्गेट देण्यात आले होते. सद्यस्थितीत ९९.२७ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. १ एप्रिलपासून रेडिरेकनरच्या दरात १० टक्के वाढ होणार असल्याने दस्तनोंदणीची गर्दी बघता कार्यालयाचा अवधी दोन तासांनी वाढविला आहे.
१ एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर वाढणारशासनाने कोरोना काळापासून रेडिरेकनरच्या दरात वाढ केलेली नाही व यंदा १० टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चअखेर दस्तनोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालयात गर्दी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना गर्दीत ताटकळत राहावे लागू नये, यासाठी ३१ मार्चपर्यंत कार्यालयांचा अवधी दोन तासांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
इ चलानव्दारे मिळाले तब्बल ९४ कोटी ६१ लाखमुद्रांक विभागाला सन २०२४ डिसेंबर पर्यत जिल्ह्यातून २ लाख ३१ हजार ४३० रुपये नोंदणी शुल्क म्हणून प्राप्त झाले. शिवाय न्यायालयाद्वारे वसूल करण्यात आलेले न्यायीक मुद्रांक १ कोटी ३२ लाख ३० हजार ६८६ रुपये प्राप्त झाले आहे. यात जून महिन्यात २७ लाख ३४ हजार ४०४, त्या पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यात २६ लाख ४५ हजार ४२ रुपये प्राप्त झाले. तर इ चलानद्वारे तब्बल ९४ कोटी ६१ लाख ७१ हजार २९६ रुपये प्राप्त झाले आहे.
१ एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर वाढणारशासनाने कोरोना काळापासून रेडिरेकनरच्या दरात वाढ केलेली नाही व यंदा १० टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चअखेर दस्तनोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालयात गर्दी वाढली आहे.
उद्दिष्टपूर्ती निश्चितजिल्ह्यास असलेल्या टार्गेटच्या तुलनेत प्राप्त महसुलाची स्थिती दिलासाजनक आहे. मार्च महिन्यात सर्व अधिकारी व कर्मचारी दोन तास जास्त सेवा देत आहेत. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती निश्चित होईल, असे निबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
उद्दिष्ट कितीचे?मुद्रांक शुल्क विभागाला सन २०२४-२५ या कालावधीत १६० कोटींच्या महसुलाचे टार्गेट आहे. त्या तुलनेत डिसेंबपर्यंत ९९ कोटी २७ लाख १९ हजार उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ही ६२.०४ टक्केवारी आहे. मार्च महिन्यात दस्तनोंदणीसाठी गर्दी होत असल्याने टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे या विभागाने सांगितले. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकारी - कर्मचारी एकदिलाने परिश्रम घेत आहेत.