शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

उत्पादन व हमीभाव कमी असताना उत्पन्न दुप्पट कसे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 23:46 IST

शेतमालाचे उत्पादन कमी व त्यांचे बाजारभावही कमी असताना सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. हा संपूर्ण प्रकार म्हणजे केंद्र व राज्य सरकारची एक लोणकढी थाप असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी केले.

ठळक मुद्देविजय जावंधिया : शेतकरी व शेतमजुरांच्या मेळाव्यात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : शेतमालाचे उत्पादन कमी व त्यांचे बाजारभावही कमी असताना सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. हा संपूर्ण प्रकार म्हणजे केंद्र व राज्य सरकारची एक लोणकढी थाप असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी केले. ते येथील शेतकरी व शेतमजूरांच्या मेळाव्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते.रोहणा येथील युवा शेतकरी मंचच्यावतीने शेतकरी व शेतमजूरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर साहित्यिक तथा लेखक डॉ. वासुदेव डहाके, सरपंच सुनील वाघ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जावंधिया पुढे म्हणाले, सरकारने मुक्त अर्थव्यवस्था सन १९९७ पासून स्वीकारताना शेतकरी आपला माल आंतरराष्ट्रीय बाजारात नेवून चांगले भाव मिळवू शकतो, असे स्वप्न दाखविले. परंतु, कोणताच शेतकरी आपला शेतमाल तेथपर्यंत नेवू शकला नाही. परिणामी, उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला. अन् मधले दलाल व मालामाल झाले आहेत. त्यातच शेतकºयांच्या आत्महत्या सुरू झाल्या. या थांबावयाचे नाव घेत नाही. आंतराष्ट्रीय बाजारात सध्या साखेरेचे भाव २४ रूपये प्रती किलो असताना आपल्याला साखर ४० ते ४२ रूपये भावाने घ्यावी लागत आहे. यासाठी शरद पवार विविध आयुधाचा वापर करीत शासनावर दबाव टाकतात. शिवाय कापसाचा भाव न परवडणारा असताना त्यासाठी आपण काहीच कां करीत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी राष्ट्रीवादीला केला.शेतमालाचे भाव पडत असताना सरकारला सबसिडी मागणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, ती भिक नाही. या गोष्टी युवा शेतकºयांनी समजून घेवून आता आपल्या मागण्यांची व आंदोलनाची दिशा बदलवणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांसाठी दर १० वर्षांनी वेतन आयोगाचा विचार होतो. पाचव्या वेतन आयोगात शासनातील चपराश्याला पगार २ हजार ५०० रूपये होता. तो सहाव्या वेतन आयोगात ७ हजार झाला. तर दहा वर्षांनी कर्मचऱ्यांचा पगार तिप्पट होत असताना सन १९७४ मध्ये गव्हाचा भाव ७४ रूपये प्रती क्विंटल होता. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या वेगाने गव्हाचा भाव. वाढला असता तर तो सन २०१४ मध्ये सहा हजार प्रती क्विंटल गव्हाला पाहिजे होता; पण आज २०१८ मध्येही गव्हाला १ हजार ५०० ते १ हजार ७०० रूपयेच भाव मिळत आहे. याचा अभ्यास युवा शेतकऱ्यांनी करून यासाठी लढा उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.एकेकाळी आमच्या सोबत कापसाला ७ हजार रूपये भाव मागणारे आजचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सध्या शेतमालाचे हमीभाव शेतकऱ्यांना फायद्यात आणणारे असल्याचे सांगतात. तेव्हा सत्ता मिळाली की, लोकप्रतिनिधी देखील शेतकऱ्यांना कसे विसरतात हे शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. मेळाव्याचे संचालन युवा शेतकरी हितेंद्र बोबडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भारत शेंडे याने मानले. मेळाव्याला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.सत्ताधाऱ्यांवर ओढले ताशेरेयेथील शेतकरी व शेतमजुरांच्या मेळाव्यात शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांसह शेतमजुरांना शासनाने दिलेली विविध आश्वासने कशी शेतकऱ्यांच्याच विरोधात जातात याची माहिती उदाहरणे देत दिली. शिवाय त्यांनी शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.