अनियंत्रित ट्रकची घराला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:43 PM2017-11-19T23:43:16+5:302017-11-19T23:43:41+5:30

भरधाव ट्रक अनियंत्रित होवून घराला धडकला यात घरात झोपून असलेले वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. यात घराचा बराचसा भाग क्षतिग्रस्त झाला.

The house of the uncontrolled truck | अनियंत्रित ट्रकची घराला धडक

अनियंत्रित ट्रकची घराला धडक

Next
ठळक मुद्देवृद्ध दाम्पत्य जखमी : घर क्षतीग्रस्त

आॅनलाईन लोकमत
केळझर : भरधाव ट्रक अनियंत्रित होवून घराला धडकला यात घरात झोपून असलेले वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. यात घराचा बराचसा भाग क्षतिग्रस्त झाला. सदर घटना रविवारला पहाटेच्या सुमारास येथील विश्रामगृहाजवळच्या वस्तीत घडली.
प्राप्त माहितीनुसार, नागपूरकडे जाणारा एमएच ३२ क्यु ९६४६ क्रमांकाच्या ट्रक चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने यशवंत शाळेकडे जाणाºया पुलाला धडक दिली. या पुलालगत रमेश दशरथ पवार यांचे घर असून त्यांच्या घराला या ट्रकने धडक दिली. यावेळी घरात असलेले रमेश पवार यांचे वृद्ध वडील दशरथ पवार आणि आई धृपदाबाई हे दाम्पत्य जखमी झाले. धडक दिल्यानंतर ट्रकचालक व वाहक वाहन सोडून पसार झाले.
या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नसली तरी घराचे जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज पवार कुटुंबियांनी व्यक्त केला. या प्रकरणी वृत्त लिहेस्तोवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे ट्रक चालकाचे नाव समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सेलू पोलीस करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Web Title: The house of the uncontrolled truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.