शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यावर ‘हॉट मिक्सर’ची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:19 IST

जिल्हा परिषदेत ३०:५४ आणि ५०:५४ या विषयाखाली १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून ग्रामीण भागाचा विकास साधावयाचा आहे. शिवाय सुशिक्षीत बेरोजगारांना यातून रोजगार मिळण्याचा आतापर्यंतचा पायंडा यंदा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मोडीत काढला.

ठळक मुद्देजि.प.च्या स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांवर विरोधकांचा आरोप

आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्हा परिषदेत ३०:५४ आणि ५०:५४ या विषयाखाली १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून ग्रामीण भागाचा विकास साधावयाचा आहे. शिवाय सुशिक्षीत बेरोजगारांना यातून रोजगार मिळण्याचा आतापर्यंतचा पायंडा यंदा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मोडीत काढला. या विषयाखाली होणारी कामे मिळविण्याकरिता पदाधिकाऱ्यांनी ‘हॉट मिक्सर‘ची अट टाकली आहे. ही अट म्हणचे सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यावर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाडच ठरत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी गटनेते संजय शिंदे यांनी केला आहे.सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विषय समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, शिक्षण सभापती जयश्री गफाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांसह विविध विभागाचे प्रमुख हजर होते. यावेळी बांधकाम विभागात धेण्यात आलेल्या या हॉट मिक्सरच्या अटीमुळे विरोधकांनी सत्ताधाºयांना धारेवर धरले.शासनाने मंजूर केलेल्या निधीतून सर्वाधिक कामे हिंगणघाट आणि समुद्रपूर या दोन तालुक्यात देण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी यावेळी केला. शिवाय इतर भागात मोजकीच कामे देण्यात आली आहेत. शिवाय जी कामे देण्यात आली ती कामे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनाच देण्यात आली आहे. काँग्रेसचा सदस्य असलेल्या भागात कामे देण्यात आली नाही. यामुळे जिल्हा परिषद पारदर्शक नसून ‘पक्षाच्या साथीतून आपला विकास’ असेच असल्याचा आरोपही संजय शिंदे यांनी केला आहे. बांधकाम विभागात सुरू असलेल्या या अनागोंदीमुळे मोठ्यांना मोठे करण्याकरिता बेरोजगारांना पुन्हा बेरोजगार करण्याचे षडयंत्र जिल्हा परिषदेत सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.पूर्वी बांधकामाची कामे सुशिक्षीत बेरोजगारांना देताना त्यांच्याकडून शंभर रुपयांच्या मुद्रांकावर तसे लेखी घेण्यात येत होते. यातून ते अभियंते हॉट मिक्सरची व्यवस्था करीत होते. आता तर थेट अट टाकून या सुशिक्षित बेरोजगारांना उपाशी ठेवण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.याशिवाय राणा रणनवरे यांनी आजनसरा येथील कोपरकर यांच्या अतिक्रमणाचा मुद्दा मांडला, वैशाली येरावार यांनी पळसगाव येथे महावितरणने घरावरून टाकलेले वायर काढण्याची मागणी केली. उपाध्यक्ष नांदूरकर यांनी तालुका कृषी कार्यालय पंचायत समितीत स्थानांतरीत करण्याची मागणी केली. मुकेश भिसे यांनी आकोली येथील पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी कापल्याचा मुद्दा उपस्थित केला. होले यांनी भिष्णूर येथील तीर्थक्षेत्राच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला.शिक्षकांऐवजी विषय तज्ज्ञांना प्रशिक्षण द्याजिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षकांकरिता विविध प्रशिक्षण राबविण्यात येतात. या प्रशिक्षणाकरिता शिक्षकांना जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत बोलावण्यात येते. शिक्षक येथे येवून दिवसभर असतात. यामुळे शाळेत शिक्षक राहत नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. प्रशिक्षणाची जबाबदारी विषय तज्ज्ञांवर देण्यात यावी अशी मागणीही या सभेत करण्यात आली.जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून कामे मंजूर करताना क्षेत्रफळाचा विचार करावा लागतो. कदाचित ही तांत्रिक बाब विरोधकांना माहीत नसावी. जी कामे मंजूर झाली ती शासनाने दिलेल्या नियमानुसारच आहे. यात कुठलाही भेदभाव नाही. केवळ विरोधकांचा गैरसमज आहे. हॉट मिक्सरची अट ही कामाच्या दर्जाकरिता टाकण्यात आली आहे. सुशिक्षीत बेरोजगारांच्या रोजगारावर कुठलीही कुºहाड येणार नाही. त्यांनाही या योजनेत कामे देण्यात येणार आहेत.-नितीन मडावी, अध्यक्ष जिल्हा परिषद वर्धा.