शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
3
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
4
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
5
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
6
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
7
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
8
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
9
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
10
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
11
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
12
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
13
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
14
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
15
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
16
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
17
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
18
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
19
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
20
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  

रुग्णालय फुल्ल; गालफुगीच्या साथीने चिमुकले हैराण

By admin | Updated: February 17, 2016 01:38 IST

वातावरण बदलाच्या काळात विषाणूजन्य आजार डोकेवर काढतात. सद्य:स्थितीत गालफुगी हा आजार बळावला असून

वर्धा : वातावरण बदलाच्या काळात विषाणूजन्य आजार डोकेवर काढतात. सद्य:स्थितीत गालफुगी हा आजार बळावला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. प्रामुख्याने या विषाणंूची लागण लहान मुलांना अधिक प्रमाणात होत असल्याने बाह्य रूग्ण विभागात गत काही दिवसांपासून असे रूग्ण वाढत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने वेळीच उपाययोजना करून आजार पसरविण्यास प्रतिबंध करणे गरजेचे ठरत आहे.गालफुगी या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला ताप येतो. यासह पोटदुखी, उलटी होणे, जेवण कमी होणे, अशी लक्षणे आढळतात. शून्य ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हा आजार आढळतो. सध्या दमट वातावरण असल्याने विषाणूंच्या वाढ होत आहे. परिणामी विषाणूजन्य आजार बळावतात. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहुल लागत आहे. त्यामुळे या काळात हे विषाणू फोफावत आहे. या आजारामुळे रुग्णाच्या जीवितास धोका नसतो. तरी शरीराच्या अपयांवर दुरगामी परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच उपचार करणे महत्त्चाचे ठरते. रुग्णाला वेळीच उपचार न मिळाल्यास विषाणूंचा प्रकोप वाढू शकतो. स्वादुपिंड, अंडाशय आणि मेंदुवर परिणाम होऊन भविष्यात व्याधी जडण्याचा धोका असतो. या आजाराची लक्षणे आढळताच डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. त्यामुळे आजारावर नियंत्रण मिळविता येते. हा संसर्गजन्य आजार असून श्वासावाटे अथवा थुंकीवाटे याचा प्रसार होतो. रुग्णाला सार्वजनिकस्थळी घेऊन जाणे टाळावे. चार पाच दिवस घरीच आराम केल्यास रुग्णाला आराम होतो.(रूथानिक प्रतिनिधी)आजाराची लक्षणे४गालफुगी हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराच्या विषाणुची लागण झाल्यावर रूग्णाला ताप येतो. कानाच्या मागे गाठ येते. पॅरॉटीड या ग्रंथीवर हे विषाणू परिणाम करतात. साधारणत: चार ते पाच दिवसांपर्यंत या आजाराचा प्रभाव असतो. विषाणूंचा प्रभाव वाढताच रूग्ण तापाने फणफणतो. पोटदुखी, उलट्या होतात. कानाजवळील गाठीची वाढ होऊन गालावर सुजन येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.प्रतिबंधात्मक उपाय४रूग्णांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास सार्वजनिक स्थळी पाठवू नये. या आजाराचे प्रमाण मुख्यत्वे लहान मुलांमध्ये आढळत असल्याने चार-पाच दिवस मुलांना शाळेत पाठवू नये. ४वेळीच उपचार करून घ्यावेत. यामुळे रुग्णाला होणाऱ्या शारीरिक बाधांपासून बचाव करता येतो. संसर्गजन्य आजार असल्याने गर्दीच्या स्थळी जाणे टाळावे. यामुळे इतरांना आजाराची लागण होणार नाही. शिवाय या आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असल्याने मुलांना शाळेत, शिकवणी वर्गाला न पाठवता घरीच आराम करू द्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.वातावरण बदलाच्या काळात विषाणूजन्य आजार बळावतात. सध्या गालफुगी आजाराचे रुग्ण वाढत आहे. या काळात पालकांनी विशेष खबरदारी घेत मुलांना सार्वजनिक स्थळी घेवून जाणे टाळावे, तसेच आजारासंबंधी लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार करून घ्यावेत.- डॉ. सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा