शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांकडून चक्क शेतकऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 21:52 IST

पंजाब नॅशनल बँकेत पीककर्जाची मागणी करण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला देवळीच्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांनी थेट मारहाण केली. ही घटना अंदोरी येथील बँकेत घडली.

ठळक मुद्देअंदोरी येथील घटना : देवळी ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पंजाब नॅशनल बँकेत पीककर्जाची मागणी करण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला देवळीच्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांनी थेट मारहाण केली. ही घटना अंदोरी येथील बँकेत घडली. या प्रकरणी शेतकरी प्रशांत चौधरी यांच्या तक्रारीवरून आरोपी महिला तहसीलदाराविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यासाठी प्रभारी तहसीलदार भागवत या अंदोरी येथे गेल्या होत्या. दरम्यान पीककर्जाअभावी आधीच त्रस्त असलेल्या चौधरी यांनी तहसीलदारांची भेट घेवून पीककर्जाबाबत व बँक अधिकाऱ्यांच्या वागणुकीबाबत आपली व्यथा त्यांच्याकडे मांडली.शेतकऱ्याची समस्या लक्षात घेवून तहसीलदारांनी सदर शेतकऱ्याला बँकेत नेले. यावेळी तक्रारकर्ता शेतकरी वरचढ होत बोलत असल्याने तहसीलदारांची सटकली. याच वेळी तहसीलदार भागवत यांनी थेट शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकही थक्कच झाले. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर आज सदर शेतकऱ्याने थेट देवळी पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून देवळी पोलिसांनी आरोपी महिला तहसीलदारांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.प्रहारकडून निलंबनाची मागणीवर्धा : शेतकऱ्याला मारहाण करणे ही बाब निंदनीयच आहे. शेतकरी प्रशांत चौधरी याला मारहाण करणाऱ्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांच्याविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा त्यांच्यावर झालेला अन्यायच आहे. सदर तहसीलदारावर कठोर फौजदारी कारवाई करीत त्यांना ४८ तासांच्या आत अटक करावी. शिवाय जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तहसीलदारांवर निलंबणाची कारवाई करावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना राजेश सावरकर, विकास दांडगे, प्रशांत चौधरी, प्रमोद कुऱ्हाटकर, शैलेश सहारे, तुशार वाघ, तुशार कोंडे, जय वाकडे, गजानन चौधरी, चेतन वैद्य, मधुकर नागपूरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदार