शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पवनार येथील ऐतिहासिक दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 18:45 IST

वाकाटककालीन पार्श्वभूमी असलेल्या पवनार येथे प्राचीन काळाची साक्ष देणारा एकमेव दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत असून त्याचे वेळीच जतन न केल्यास ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्याची शक्यता पुरात्त्व अभ्यासकांनी केली आहे.

ठळक मुद्देपरिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाकाटककालीन पार्श्वभूमी असलेल्या पवनार येथे प्राचीन काळाची साक्ष देणारा एकमेव दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत असून त्याचे वेळीच जतन न केल्यास ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्याची शक्यता पुरात्त्व अभ्यासकांनी केली आहे. या प्राचीन दिल्ली दरवाजाचे जतन करण्यासाठी पुरातत्व निदेर्शानुसार संरक्षित करण्यात यावी आणि या ऐतिहासिक वास्तूची पुनर्बांधणी करून परिसराचेही सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी बहार नेचर फाउंडेशनद्वारे करण्यात आली आहे.

वाकाटककालीन पार्श्वभूमी असलेले पवनार हे गाव प्राचीन संस्कृती व ऐतिहासिक वारसा यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. द्वितीय प्रवरसेन राजाची राजधानी असलेले प्रवरपूर हे आज पवनार या नावाने ओळखले जाते. या गावाचा उल्लेख आईना ए अकबरी या ग्रंथात पनार या नावाने आढळतो. या गावात झालेल्या खोदकामात प्राचीन मूर्त्या अजूनही सापडतात, असे पवनारवासियांनी सांगितले. कधीकाळी या गावाला चहुबाजूने परकोट असल्याने त्याचेही अवशेष येथे आढळून येतात. या परकोटाला असलेल्या चार दरवाजांपैकी केवळ एक दरवाजा शिल्लक असून तो दिल्ली दरवाजा या नावाने ओळखला जातो. या ऐतिहासिक वारशाचा मागोवा घेण्यासाठी नुकतीच बहारच्या अभ्यासकांनी या गावाला भेट दिली.

या भेटीत दिल्ली दरवाजाची दुरवस्था झाली असून एक बाजू अत्यंत नाजूक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. दरवाज्यावर वेली तसेच अवतीभवती झुडुपे वाढलेली आहेत. शिवाय, मानवी हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात असल्याने दरवाज्याला लागूनच बांधलेली गुरे व शेणखताचा मोठा ढीग दिसून आला. या दरवाज्यावर एक शिलालेख असून तो कधीही निखळून पडू शकतो, अशी अवस्था झाली आहे. याची वेळीच दखल घेतली नाही तर या शिलालेखासह एक ऐतिहासिक दस्तावैज नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अन्य वास्तूंमध्ये वापरल्या गेलेले कोरीव दगडही गावात सर्वत्र अस्ताव्यस्त स्थितीत आढळून आले आहेत. बहारच्या सदस्यांनी ग्रामवासियांशी संवाद साधला असता गतवैभवाची साक्ष देणाऱ्या या वास्तूचे जतन व्हावे, ही भावना त्यांच्यातही दिसून आली.

या प्राचीन ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासोबतच दरवाज्याच्या भोवतालचा परिसरही संरक्षित करावी, दरवाजासमोरील मोकळ्या जागेत उद्यान निर्माण करावे आणि त्याशेजारीच संशोधनाच्या दृष्टीने एक छोटेखानी वस्तुसंग्रहालय उभारून ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या प्राचीन मूर्त्या व अवशेषांचे संकलन करावे, अशी मागणी पवनारभेटीत सहभागी झालेले बहारचे सदस्य संजय इंगळे तिगावकर, प्राचीन वास्तूअभ्यासक आर्किटेक्ट निखिल अवथनकर जैन यांनी केली आहे. या भेटीत स्थानिक नागरिक सुधाकर महाराज, शेख बब्बू व रमेश पलटनकर यांनी सहकार्य केले. या संदर्भात शासनाला निवेदन व प्रस्ताव देणार असल्याची माहिती बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, उपाध्यक्ष आर्कि.रवींद्र पाटील, डॉ. बाबाजी घेवडे, डॉ. जयंत वाघ, पराग दांडगे, वैभव देशमुख, स्नेहल कुबडे यांनी दिली आहे.

टॅग्स :historyइतिहास