शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे हिंगणघाटातील जळीतकांड प्रकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 11:34 IST

हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीतकांडाने देशामध्ये खळबळ उडवून दिली होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हे प्रकरण लांबणीवर पडल्याने न्यायासाठी पित्याची धडपड सुरु आहे.

ठळक मुद्देदोषारोपपत्र दाखल मुलीला न्याय मिळण्यासाठी पित्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीतकांडाने देशामध्ये खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाचे तात्काळ दोषारोपत्र दाखल करुन आरोपीला फाशी देण्याची मागणी सर्वस्तरातून करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून न्यायदानाचे कामकाज ठप्प आहे. परिणामी आता हे प्रकरण लांबणीवर पडल्याने न्यायासाठी पित्याची धडपड सुरु आहे.

हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावातील एक युवती हिंगणघाटच्या एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करीत होती. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्याकरिता बसमधून हिंगणघाटच्या नंदोरी चौकामध्ये उतरली. तेथून महाविद्यालयाकडे पायदळ जात असताना तिच्या मागावर असलेल्या गावातीलच युवकाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविले. गंभीर जखमी झालेल्या या प्राध्यापिकेचा नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आठव्या दिवशी मृत्यू झाला. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेचे पडसाद जिल्ह्यासह देशपातळीवर उमटले. आरोपीला तत्काळ अटक करुन फाशीची शिक्षा द्या, प्रकरण जलद न्यायालयात चालवा, अशा विविध मागण्यांसाठी सर्वत्र कॅन्डल मार्च, निषेध मोर्च काढण्यात आले.

पोलिसांनी घटनेनंतर अल्पावधीतच आरोपीला अटक केली. या घटनेसंदर्भात संपूर्ण पुरावे गोळा करुन दोषारोपपत्र दाखल केले. यातील आरोपीला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. पण, कोविड-१९ च्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने न्यायदानाचे कामकाज ठप्प पडले आहे. संचारबंदीच्या काळात न्यायालयात साक्षिदारांना न बोलाविता केवळ अतिमहत्त्वाचे किंवा युक्तिवादावर असलेली प्रकरणेच न्यायालयात घेतली जात असल्याने जळीतकांडाचे प्रकरण सध्यातरी लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.

जलदगती न्यायालयाला मंजूरीप्राध्यापिका जळीतकांडाचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, तसेच हा खटला अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यामार्फत चालविण्याची मागणी विविध सामाजिक संघटना तसेच पीडितेच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची दखल घेत हा खटला अ‍ॅड. उज्ज्वल निकम निकम यांच्यामार्फत चालविण्याचे आदेश दिले होते. जलदगती न्यायालयावर न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण, कोरोनामुळे हा खटला रखडला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी साक्षीदारांना न्यायालयात न बोलविण्याच्या सूचना आहे. केवळ युक्तीवादावर असलेली प्रकरणे घेण्यात येत आहे. जलदगती न्यायालय मंजूर झाले असून न्यायाधिशांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पण, कोरोनामुळे प्राध्यापिका जळीतकांड प्रकरण लांबणीवर पडले आहे.- अ‍ॅड.विनय घुडे, शासकीय अभियोक्ता, पोस्को सेल.

टॅग्स :Hinganghatहिंगणघाट