शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंगणघाट जळीत प्रकरण : १५ दिवसांत प्रत्यक्ष सुनावणीस न्यायालयाने दिली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 19:15 IST

Wardha News court ॲड. उज्ज्वल निकम यांनी सोमवारी हिंगणघाट येथील न्यायालयात येत हिंगणघाट जळीत प्रकरणात शासकीय बाजू मांडली. तब्बल एक तास न्यायालयात युक्तीवाद झाला. न्यायालयाने १५ दिवसात प्रत्यक्ष सुनावणी करायला परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देएक तास चालला युक्तीवाद

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ॲड. उज्ज्वल निकम यांनी सोमवारी हिंगणघाट येथील न्यायालयात येत हिंगणघाट जळीत प्रकरणात शासकीय बाजू मांडली. तब्बल एक तास न्यायालयात युक्तीवाद झाला. विशेष म्हणजे आज आरोपीची बाजू मांडणारे वकिल गैरहजर होते. सरते शेवटी न्यायालयाने १५ दिवसात प्रत्यक्ष सुनावणी करायला परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला दुपारी १२ वाजताच्या सुमारास अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश माझगावकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सुमारे एक तास हिंगणघाट जळीत प्रकरणा विषयी न्यायालयात कामकाज चालले. दुपारी १ वाजताच्या सुमारास या प्रकरणातील न्यायालयीन कामकाम संपल्यावर ॲड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधून येत्या १७ डिसेंबरला आरोपीवरील आरोप निश्चित करण्यात येऊन १५ दिवसात प्रत्यक्ष सुनावणी करायला न्यायालयाने परवानगी दिली आहे. साक्ष व पुरावे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल अशी माहिती दिली. हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या सुणावणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.बघ्यांनी केली होती एकच गर्दीहिंगणघाट जळीत प्रकरणात राज्य शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम हे स्वत: न्यायालयात येत असल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने न्यायालयाच्या समोर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. ॲड. उज्ज्वल निकम हे सकाळी १०.३० वाजता हिंगणघाट येथील विश्रामगृहात पोहोचले. त्यानंतर ते ११.२२ वाजता हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचले.स्थानिक वकिलांशी साधला संवादहिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयात येण्यास आणखी थोडा कालावधी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ॲड. निकम यांनी स्थानिक वकिलांशी बार असोसिएशनच्या हॉलमध्ये भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. तेथे बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक काकडे व सचिव अर्शी मोहम्मद यांनी त्यांचे स्वागत केले.सूर्य डोक्यावर येताच आरोपी न्यायालयातहिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपीला सुनावणी असल्याने नागपूर येथील कारागृहातून हिंगणघाट येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दुपारी १२ वाजता कडेकोड पोलीस बंदोबस्तात आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन कामकाजाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. असे असले तरी आज आरोपीचे वकिल उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत आरोपी समक्ष त्याच्यावर असलेले आरोप प्रस्तावित करण्यात आहे. ३ फेब्रुवारीला दाखल झाले होते ४२६ पानांचे दोषारोपपत्रहिंगणघाट जळीत प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी शासकीय सुटीचे दिवस वगळून अवघ्या १९ दिवसांत पूर्ण करून ३ फेब्रुवारी २०२० रोजी न्यायालयात दाखल केले होते. पण कोरोना संकटामुळे हे प्रकरण मागील काही महिन्यांपासून थंड बस्त्यात होते. तर आज ॲड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात शासकीय बाजू मांडली.

राज्य शासनाचा क्रांतीकारी निर्णय - ॲड. उज्ज्वल निकमराज्य शासन या अधिवेशनात महिलां संदर्भात दिशा नव्हे तर शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्याची शक्यता आहे. हा कठोर कायदा संमत झाल्यास महिलांवरील अत्याचाराला चाप बसेल. हा कायदा येथे मजुर झाल्यावर तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. महीलांचे सबलीकरण व्हावे व महिलांच्या अत्याचाराला जरब बसावी याच्या कठोर तरतुदी या कायद्यात करण्यात आलेल्या आहेत. राज्य शासनाचा हा क्रांतीकारी निर्णय असून बलात्कार, विनयभंग व रासायनिक तज्ज्ञांचा अहवाल त्वरीत मिळण्याबाबतच्या तरतुदी या कायद्यात करण्यात आल्या आहेत. या कायद्यामुळे महिलांविरोधात समाजमाध्यमावर जे आक्षेपार्ह लिहिल्या जाते त्याला देखील पायबंद बसेल, असे याप्रसंगी ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले

टॅग्स :Courtन्यायालयHinganghatहिंगणघाट