शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

हिंदी विश्वविद्यापीठाचे कुलगुरु निलंबित, वाद कायम; कार्यकारी परिषदेचा निर्णय

By रवींद्र चांदेकर | Updated: April 29, 2024 20:19 IST

आधी कारणे दाखवा नोटीस, कुलगुरुपदाचा वाद अद्याप कायमच

वर्धा: येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा वाद अद्याप कायम आहे. आता प्रभारी कुलगुरु प्रो. के. एल. कारुण्यकरा यांना विद्यापीठाच्या कार्यकारी परिषेदेने निलंबित केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कुलगुरूंच्या खुर्चीवर कब्जा केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाचे तत्कालीन प्रभारी कुलगुरु म्हणून प्रो. कारुण्यकरा यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. नंतर त्यांना हटवून डॉ. भीमराय मेत्री यांची नियुक्ती केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ती रद्द केली होती. न्यायालयाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला नियमानुसार नवीन कुलगुरु नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रभारी कुलगुरु प्रो. के. एल. कारुण्यकरा हे ३१ मार्च रोजी विश्वविद्यापीठात आले. ते कुलगुरूंच्या खुर्चीवर स्थानापन्न झाले होते. माहिती मिळताच कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया यांनी तेथे पोहोचून प्रो. कारुण्यकरा यांना न्यायालयाच्या आदेशाच्या प्रत दाखविण्याची मागणी केली. मात्र, प्रो. कारुण्यकरा यांनी मला कोणत्याही आदेशाची गरज नाही, मी स्वत: कुलगुरु आहे, असे सांगितले होते. त्यानंतर प्रो. कारुण्यकरा यांनी अनेक आदेश जारी केले होते. त्यात कुलसचिव डॉ. कठेरिया यांच्या निलंबनाचा आदेशही होता.

दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने बोलविलेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीलाही त्यांनी निरस्त केले. कुलसचिव म्हणून डॉ. अमरेन्द्र कुमार शर्मा यांची नियुक्तीही केली. दरम्यान, प्रो. कारुण्यकरा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यांचे अपिल खारीज केले होते. तसेच न्यायालय आणि शिक्षण मंत्रालयाने विश्वविद्यालयाच्या कार्यकारी परिषदेला निर्णय घेण्यास सांगितले होते. आता विश्वविद्यालयाच्या कार्यकारी परिषदेने प्रा. कारुण्यकरा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी त्यांना निलंबित केले आहे. 

बॉक्स

यापूर्वी बजावली होती कारणे दाखवा नोटीस

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ५ एप्रिल रोजी विद्यापीठाला कार्यकारिणीची त्वरित बैठक घेण्यास सांगितले होते. त्याअनुषंगाने, कार्यकारी परिषदेची बैठक झाली. त्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, अधिनियम, १९९६ (१९९७चा ३) आणि १७ व्यावसायिक आचार संहिता विद्यापीठ अनुदान आयोग, विनियम, २०१८ च्या संहिता २६ चे उल्लंघन केल्यामुळे परिषदेचे पदसिद्ध सचिव प्राे. कारुण्यकारा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, कारुण्यकरा यांनी सात दिवसांत आपली बाजू मांडली नाही. त्यामुळे आता परिषदेने त्यांना निलंबित केले आहे. 

बॉक्स

कृष्ण कुमार सिंह प्रभारी कुलगुरु

वरिष्ठ अनुवाद व निर्वाचन विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. कृष्ण कुमार सिंह यांनी २७ एप्रिल रोजी प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते १ जुलै २०१० पासून विश्वविद्यालयात कार्यरत आहेत.

टॅग्स :hindiहिंदी