शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

जनहित याचिकेला उच्च न्यायालयाची स्थिगिती

By admin | Updated: August 23, 2015 02:18 IST

ग्रामपंचायत कर आणि शुल्क नियम १९६० अंतर्गत हद्दीतील इमारतीच्या भांडवली मुल्यावर आधारित कर व शुल्क आकारणी चुकीची व अन्यायकारक ...

खरांगाणा (मोरांगणा) : ग्रामपंचायत कर आणि शुल्क नियम १९६० अंतर्गत हद्दीतील इमारतीच्या भांडवली मुल्यावर आधारित कर व शुल्क आकारणी चुकीची व अन्यायकारक असल्याच्या कारणावरून उच्च न्यायानलयात याचिका दाखल करण्यात आली होती. या जनहित याचीकेतील मुद्दे विचारता घेत तिला स्थगिती दिल्याने महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीच्या वसुल्या थांबल्याने ग्रामपंचायती डबघाईस आल्याचे दिसते आहे. दैनंदिन कामकाज करताना विकास कामांसोबतच, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठ्याचे ब्लिचिंग पावडर, नाल्या सफाई, रस्ता दुरूस्ती, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व इतर सर्व कामे तसेच साहित्य वस्तूंचा पुरवठा करताना ग्रामपंचायतींच्या नाकी नऊ येत आहे. विरळ लोकसंख्येच्या डोंगराळ व दुर्गम भागातील ग्रामपंचायती तर गत एक वर्षापासून पुरत्या कंगाल झालेल्या आहेत. ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या व सुखसोईच्या दृष्टीने आर्थिक विवंचनेमुळे कोणत्याच दैनंदिन सार्वजनिक सेवा पुरवू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर हीच स्थिती असल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढून निर्णय व्हावा, अशी अपेक्षा ग्रामपंचायत कमेटी व प्रशासनाची आहे.कर व शुल्क आकारण्या संदर्भात सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीने ९ जानेवारी २०१५ रोजी शासनाने एक अभ्यासगट स्थापन करून शिफारस करण्यास सांगितले. ग्रामपंचायतींच्या अधिकार क्षेत्रातील बांधकामावर कशाप्रकारे कर आकारणी करण्यात यावी. या बाबतचा निर्णय उच्च न्यायालयाला कळवून मंजुरी मिळेपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे. वसुली अभावी ग्रामपंचायती मात्र आर्थिक टंचाईच्या खाईत लोटल्या जात आहे. तसेच नागरिकांना अनेक व्यवहार व कामे करताना कर पावतीची शासन दरबारी मागणी केल्या जात असल्याने कामात अडथळे निर्माण होत आहे. या सर्व बाबी गृहीत धरून यावर त्वरीत निर्णय व्हावा, अशी सर्वांची मागणी आहे.(वार्ताहर)