शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कोविडपेक्षा उच्च रक्तदाब अन् मधुमेह ठरतो भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

मंगळवार ८ डिसेंबरला कोविड मृतकांचे डेथ ऑडिड करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, डॉ. झलके तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, डॉ. गाठे तसेच सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयातील तीन डॉक्टर आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकोरोना मृतकांच्या डेथ ऑडिटचा प्रार्थमिक निष्कर्ष

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल २६१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी या कोविड मृतकांचे डेथ ऑडिट करण्याचा निर्णय वर्धा जिल्हा प्रशासनाने घेतला असून कोविडपेक्षा उच्च रक्तदाब आणि मधुमेहच भारी ठरत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांच्या प्रार्थमिक चौकशीत पुढे आले आहे.मंगळवार ८ डिसेंबरला कोविड मृतकांचे डेथ ऑडिड करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, डॉ. झलके तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, डॉ. गाठे तसेच सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयातील तीन डॉक्टर आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.या बैठकीत विविध बाबींवर चर्चा करीत काही निष्कर्ष काढण्यात आले. शिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना पूर्वी काही आजार होते काय याचा शोध घेण्यात आला. या प्रार्थमिक चौकशीदरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी बहूतांश व्यक्तींना उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा आजार असल्याचे पुढे आले आहे. लवकरच डेथ ऑडिटचा सखोल अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.राज्यातील पहिला प्रयोगकोविड मृतकांचे डेथ ऑडिट करण्याचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग वर्धा जिल्ह्यात केला जात आहे. तो राज्यासाठी मार्गदर्शक तसेच राज्यातील पहिला असल्याचे सांगण्यात येते. लवकरच या डेथ ऑडिटचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर होणार आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य