शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:28 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशनच्यावतीने आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर (कोरा) येथील तरुण शेतकरी विलास चौके, रासा गावातील शेतकरी आत्माराम तोडासे यांनी कर्जबाजारीपणा व तोट्यातील शेती व्यवसायाला कंटाळून आत्महत्या केली.

ठळक मुद्देआधार संघटनेच्यावतीने नाम फाऊंडेशनच्या धनादेशाचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशनच्यावतीने आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर (कोरा) येथील तरुण शेतकरी विलास चौके, रासा गावातील शेतकरी आत्माराम तोडासे यांनी कर्जबाजारीपणा व तोट्यातील शेती व्यवसायाला कंटाळून आत्महत्या केली. तर अंतरगाव या गावातील शेतकरी किसना श्रीसागर यांचा शेतातील विहीरीत पडून अपघाती मृत्यु झाला. या तिन्ही घटनेची माहिती समुद्रपूर तालुक्याच्या नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी दिनेश जाधव यांना मिळताच त्यांनी ही माहिती नाम फाउंडेशनचे विदर्भ व खांदेश प्रमुख हरीश इथापे यांना दिली असता लगेच त्यांनी चौकशी करुन नामच्यावतीने प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत जाहीर केली.या तात्काळ मदतीचे धनादेश आधार संघटनेच्यावतीने नारायणपूर (कोरा) येथील विलास चौके यांची आई शांता चौके तसेच रासा येथील आत्माराम तोडासे यांची पत्नी लिला तोडासे व अंतरगाव येथील किसना श्रीसागर यांची पत्नी कासा श्रीसागर या तिन्ही कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आली.धनादेश देतांना आधार संघटनेचे संघटक दिनेश जाधव, सिंदी शहर प्रमुख शाहरुख पठाण, उपाध्यक्ष विजय राऊत, सचिव भुषण उगेमुगे, मिडिया प्रमुख आदिनाथ काटोले, समुद्रपूर उपाध्यक्ष शुभम महंतारे, महेश अवचट, मंगेश मिश्किन, आनंद मुडे, शुभम झाडे, प्रवीण भारसाखरे व पंकज नागमोते तसेच आधारचे पदाधिकारी उपस्थित होते.योग्य पाठपुरावा करुन तात्काळ व घरपोच मदत मिळवून दिल्याबद्दल मदतप्राप्त कुटुंबियांनी आभार मानले.

टॅग्स :Farmerशेतकरी