शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पोलीस पत्नीने केली पतीला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 16:43 IST

पोलीस पत्नीने तिच्याच पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस प्रियकराची मदत घेत पतीला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. ही घटना केळझर येथे घडली.

ठळक मुद्देकेळझर येथील घटना : सेलू पोलिसात दिली तक्रार

वर्धा : पोलीस पत्नीने तिच्याच पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस प्रियकराची मदत घेत पतीला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. ही घटना केळझर येथे घडली. पतीने याबाबतची तक्रार सेलू पोलिसात दिली, पण पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून काढता पाय घेतला.

केळझर येथील अयफाज जमीर शेख हा ट्रॅव्हल्सवर वाहक म्हणून काम करतो. त्याचा प्रेमविवाह २०१४ मध्ये पूजा गिरडकर रा. वर्धा हिच्याशी झाला. अयफाजची पत्नी पूजा ही कारंजा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून नोकरीवर आहे. मात्र, तिचे प्रेमसंबंध त्याच ठाण्यातील नाईक पोलीस शिपाई मनोज सूर्यवंशी याच्याशी जुळले. अयफाजने तिला अनेकदा समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूजा नेहमी वाद करीत होती, असे अयफाजने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बुधवारी पत्नी पूजा ही अयफाजच्या घरी आली आणि मुलाचे कपडे बॅगमध्ये भरत होती. काही वेळात मनोज सूर्यवंशी हा घरात आला. अयफाजने त्यास हटकले असता पूजा आणि मनोज या दोघांनी अयफाजला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच पूजाने पती अयफाजच्या कानशिलात लगावली. पूजा आणि मनोज हे दोघेही मद्यधुंद असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची तक्रार अयफाजने सेलू पोलिसात दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली हे विशेष.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस