शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचारी चकरी आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:58 IST

जि.प. अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या बाबत १७ एप्रिलला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक पार पडली. त्यावेळी आठ दिवसात मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण सहा महिने लोटूनही कुठलीही कार्यवाही न झाल्याने येत्या २२ आॅक्टोबरपर्यंत मागण्या निकाली काढा अन्यता चकरी आंदोलन करण्यात येईल,.....

ठळक मुद्देमागण्या निकाली काढण्यासाठी डीएचओंना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जि.प. अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या बाबत १७ एप्रिलला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक पार पडली. त्यावेळी आठ दिवसात मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण सहा महिने लोटूनही कुठलीही कार्यवाही न झाल्याने येत्या २२ आॅक्टोबरपर्यंत मागण्या निकाली काढा अन्यता चकरी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांना सादर केलेल्या निवेदनातून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने दिला आहे.आरोग्य विभागात उपकेंद्र कार्यरत अर्धवेळ स्त्री परिचर यांना ५ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. ते तात्काळ देण्यात यावे. आरोग्य सेविकेच्या रिक्त पदावर कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविकेची सेवा नियमित करावी. आरोग्य पर्यवेक्षक रिक्त पदावर आरोग्य सहाय्यक स्त्री-पुरुष यांना पदोन्नती देण्यात यावी. आरोग्य सहाय्यक रिक्त पदावर आरोग्य सेविका अथवा सेवक या संवर्गातून पदोन्नती देण्यात यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा व चौथा शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात यावी. शासन निर्णय ६ आॅगस्ट २००७ च्या आकृतीबंधा नुसार आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक मंजूर पदे त्वरित भरण्यास यावे, लेखाशिर्ष २२११ चे मंजूर रिक्त पदे त्वरित भरावे, शासन निर्णय १७ जानेवारी २०१३ नुसार मंजूर पदे त्वरीत भरावे. आरोग्य सेवक दिलीप धुडे रा. कामठी यांचे आंशदायी पेन्शन योजनेतील पैशाचा घोळ दुर करुन इतर कर्मचाऱ्यांच्या कपात पैसाची चौकशी करावी. आरोग्य कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक समस्या तात्काळ निकाली काढाव्या. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १२ व २४ वर्षांची कालबद्ध पदोन्नती त्वरीत द्यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.सदर मागण्यांवर येत्या २२ रोजीपर्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या निकाली काढाव्या अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांना निवेदन देताना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ तेलतुंबडे, नलीनी उबदेकर, दीपक कांबळे, वंदना उईके, विजय जांगडे, सुजाता कांबळे, संजय डफरे, अनुराधा परळीकर, रतन भेंडे, रंगराव राठोड, विठ्ठल केवटे, हेंमत उघडे, अमित कोपुलवार, विकास माणिककुडे, ममता लोखंडे, निलेश साटोणे, संजय डगवार, प्रभाकर सुरतकर, बाबाराव कनेर, श्याम जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :Healthआरोग्य