शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

स्वच्छतेअभावी आरोग्य धोक्यात

By admin | Updated: December 10, 2014 23:02 IST

देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ शासकीय कर्मचाऱ्यांसह शाळेतील विद्यार्थीही यात सहभागी होत आहे़ अनेक ग्रामपंचयतींनीही स्वच्छता अभियान राबविले; पण गावात स्वच्छतेला बगल दिली

वायगाव (नि़) : देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ शासकीय कर्मचाऱ्यांसह शाळेतील विद्यार्थीही यात सहभागी होत आहे़ अनेक ग्रामपंचयतींनीही स्वच्छता अभियान राबविले; पण गावात स्वच्छतेला बगल दिली जात असल्याचेच दिसते़ यामुळेच गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ ग्रा़पं़ प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ स्थानिक वॉर्ड क्रमांक ६ मधील हनुमान देवस्थानाजवळ अस्वच्छतेचा कळस आहे़ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रा़पं़ प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याने घाणीच्या साम्राज्यात वाढ होत आहे़ यामुळे साथीच्या आजाराचा प्रकोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर वॉर्डात स्वच्छता करण्यात येणार काय, असा प्रश्न नागरिकांद्वारे उपस्थित केला जात आहे़ सध्या वॉर्ड क्ऱ ६ मध्ये नाल्या तुंबल्या असून नालीतील सांडपाणी व किडे परिसरातील घरांमध्ये शिरत असल्याचे दिसते़ गावात अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरलेली आहे़ रस्त्यावर साचलेला कचरा आणि नालीतील सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना तोंडाला रूमाल लावूनच ये-जा करावी लागते़ कित्येक दिवसांपासून नाल्या न उपसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे़ विशेषत: वॉर्ड क्रमांक ६ हा सरपंचाचा आहे़ या परिसरापासून काही अंतरावर सरपंचाचे घर असताना अस्वच्छता पसरल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत़ नालीतील सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून चिमुकल्यांसह वृद्धांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे़ काही नागरिकांच्या स्वयंपाक घरात नालीतील किडे आढळून आल्याने गावात असंतोष पसरला आहे़ याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या; पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसते़ यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रा़पं़ प्रशासनास सादर केले असून निवेदनाच्या प्रती मंत्र्यांनाही पाठविल्या आहेत़ गावात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, तसेच नाल्यांची सफाई करून नाल्या वाहत्या करण्यात याव्या अशी मागणी प्रमोद, हरणे, सुरेश ढोले, मोहन वांदाडे, उल्हासराव तलमले, शालिक वरघणे, सुधाकर चांभारे, गणेश देवतळे यांच्यासह नागरिकांनी निवेदनातून केली आहे़(वार्ताहर)