शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर व मेळावा

By admin | Updated: October 17, 2015 02:55 IST

येथील संकल्प ज्येष्ठ नागरिक समितीच्या वतीने स्थानिक माहेर मंगल कार्यालयात तीन दिवसीय सामाजिक, ...

सामाजिक उपक्रम : संकल्प ज्येष्ठ नागरिक समितीसेलू : येथील संकल्प ज्येष्ठ नागरिक समितीच्या वतीने स्थानिक माहेर मंगल कार्यालयात तीन दिवसीय सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक व आरोग्य विषयक शिबिर तसेच आनंद मेळावा घेण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक व समाज सेवक मोतीलालजी जयस्वाल यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. पहिल्या दिवशी श्री श्री रविशंकर यांच्या अनुयायांकडून आध्यात्मिक योग शिबिर घेण्यात आले. प्रशिक्षक बालपांडे, पुनम पांडे, व्यास, किरण वाघमारे व त्यांच्या सहकार्याकडून योगाचे धडे ज्येष्ठांना देण्यात आले. प्रकाश महाराज वाघ व त्यांच्या संचाने समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला. यावेळी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात कस्तुरबा मेडिकल कॉलेज सेवाग्रामच्या चाळीस डॉक्टरांच्या चमूने उपस्थित राहून विविध आजाराचे निदान केले. रात्रीला सुरगाव येथील सप्त खंजेरीवादक व राष्ट्रसंताच्या विचाराचे प्रचारक प्रवीण देशमुख यांचा सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम झाला.शेवटच्या दिवशी नेत्र तपासणी व उपचार, दंतरोग व स्त्री रोग तपासणी तसेच रक्तदाब तपासणी करण्यात आली. डॉ. केशव लोणकर यांनी ही तपासणी केली. स्त्री रोग तपासणी डॉ. अर्पिता जयस्वाल तसेच दंतरोग तपासणी डॉ. अर्पण जयस्वाल व शरद पवार दंत महाविद्यालय सावंगी मेघे च्या चमूनी केली.नेत्र तपासणी नेत्रतज्ज्ञ डॉ. विनोद अदलखिया व डॉ. नेत्रा जायस्वाल यांनी केली. यात दृष्टीदोष असलेल्या रूग्णांना शस्त्रक्रिया विनामुल्य करून देण्याची व्यवस्था डॉ. अदलखिया यांच्या वर्धा येथील नेत्रा दवाखान्यात करण्यात आली. जेष्ठ नागरिक समितीचे संयोजक सुरेश जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. संचालन एम.बी. महाकाळकर व अरविंद उईके यांनी केले. आयोजनासाठी श्रावण मकरंदे, खेमराज शेटे, गजानन मकरंदे, वसंतराव खोडके, वसंतराव राऊत, चावरे, रामदास रेवतकर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)