शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

चोरीच्या लोखंडाची विल्हेवाट करायला गेले अन् पोलिसांच्या हाती लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

मोरांगणा येथील रहिवासी शेतकरी पवन शंकर लांडे आणि मंगेश पळसराम मांढरे यांच्या शेतातून मोटारपंप आणि लोखंडाचे शेतीपयोगी साहित्य चोरून नेल्याची तक्रार त्यांनी खरांगणा पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार खरांगणा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले असता चोरटे सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीत चोरलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यास गेल्याची माहिती मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतातील चोरलेल्या लोखंडी साहित्यांची विल्हेवाट लावण्यास गेलेल्या चार चोरट्यांना सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहत परिसरातून १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीतील ४ लाख ९५ हजार रुपयांचे एक टन बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेटा आणि नऊ मोटारपंप जप्त करण्यात आले. अटक केलेल्यांत चेतन विठ्ठल पिंपळे, रा. येळाकेळी, मोहम्मद जमालुद्दीन शेख शराफत अली, रा. सावजी नगर वर्धा, कौशल पुरुषोत्तम लटारे, रा. येळाकेळी, मोहम्मद नदीम शेख मोहम्मद ईस्माईल शेख, रा. नागपूर यांचा समावेश आहे. मोरांगणा येथील रहिवासी शेतकरी पवन शंकर लांडे आणि मंगेश पळसराम मांढरे यांच्या शेतातून मोटारपंप आणि लोखंडाचे शेतीपयोगी साहित्य चोरून नेल्याची तक्रार त्यांनी खरांगणा पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार खरांगणा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले असता चोरटे सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीत चोरलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यास गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी कर्मचाऱ्यांना घेत थेट सेवाग्राम गाठून चारही चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून मालवाहू वाहनासह बंधाऱ्याच्या १ टन प्लेटा आणि ९ मोटारपंप असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर विनोद सानप, संतोष कामडी, अशफाक शेख, बमनोटे, गिरीश चंदनखेडे यांनी केली. 

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस