शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हवालदिलांची समस्या उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारी; पाच गावांतील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसानभरपाई

By अभिनय खोपडे | Updated: August 18, 2023 16:46 IST

भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश

वर्धा : आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या विसर्गामुळे अनेक वर्षांपासून पाच गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली येऊन प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच शेतकऱ्यांची समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाई मिळणार आहे.

सन २०१२ पासून निम्न वर्धा धरणातून १८०० ते दोन हजार क्युसेक प्रति सेकंद पाणी सोडले जात आहे. जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी जलाशयातून सोडण्यात आले तेव्हा तेव्हा रोहना, दहापूर, दिघी, सायखेडा, सोरटा या शिवारातील शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली आली. अशातच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वारंवार संबंधितांना निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने जलसमाधी आंदोलनाची घोषणा करण्यात आली.

याची माहिती सुमित वानखेडे यांना मिळताच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची माहिती दिली. शिवाय नागपूर येथे बैठक पार पडली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याने लवकरच नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश भूसंपादन विभागाला देण्यात आले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwardha-acवर्धा