शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीने प्रवास करणारे आमदार पाहिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे सन्माननीय व्यक्ती महाराष्ट्र विधान परिषद अथवा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आहेत, अशा आजी व माजी आमदारांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या म्हणजेच अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी व परिवर्तन बसमधून महाराष्ट्र राज्यात तसेच आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजी, माजी आमदारांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकाऱ्यासह एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील चारपैकी दोन आमदारांनी पाच वर्षांत एसटीतून मोफत प्रवास केला, तर एका माजी आमदाराने एसटीतून प्रवास केल्याची बाब ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.  आलिशान महागड्या गाड्यांमधून फिरणाऱ्या आमदारांना सवलत कशाला? असा प्रश्न जनमानसातून उपस्थित केला जात आहे.एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत आजी, माजी आमदारांना मोफत प्रवासाची सवलत देणारे परिपत्रक  तत्कालीन परिवहनमंत्री  दिवाकर रावते यांच्या काळात जारी करण्यात आले. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे सन्माननीय व्यक्ती महाराष्ट्र विधान परिषद अथवा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आहेत, अशा आजी व माजी आमदारांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या म्हणजेच अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी व परिवर्तन बसमधून महाराष्ट्र राज्यात तसेच आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येत आहे. जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी-पुलगाव असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. चारपैकी दोन आमदारांनी, शिवाय एकमेव माजी आमदाराने एसटीतून प्रवास केला आहे. 

कधी एसटीतून प्रवास केला आहे का? पुणे येथील रेल्वे स्थानकावर उतरलो होतो. पुणे-मुंबई मार्गावरील एका हॉटेलमध्ये पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. हॉटेलात पोहोचण्याकरिता एसटीतून प्रवास केला होता. याला तीन वर्षांचा काळ लोटला.-दादाराव केचे, आमदार, आर्वी विधानसभा.

शासनाकडून आमदारच नव्हे, तर माजी आमदारांनाही एसटीतून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. वाहकाच्या शेजारील आसन आमदारांकरिता राखीव असते. चार वर्षांपूर्वी वर्धा-नागपूर असा एसटी बसने प्रवास केला.-डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा विधानसभा.हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही.

चारचाकीत फिरणाऱ्यांना कशाला हवी सवलत?

आमदारांकडे स्वत:च्या मालकीची चारचाकी वाहने आहेत. टुमदार बंगला आणि सर्व सुखसोयी आहेत. असे असताना शासनाकडून त्यांना सवलती दिल्या जातात. सर्वसामान्यांना मात्र, कुठल्याही सोयी सवलती नाहीत. जनतेच्या पैशातूनच शासन त्यांना विविध सुविधा प्रदान करते. आर्थिकदृष्ट्या सक्षम आमदारांना कोणत्याही सुविधा शासनाने देऊ नये.-सचिन बक्षी, वर्धा.

आमदारांना शासनाकडून विविध भत्ते, सवलती आणि सुविधा मिळतात. पेन्शनदेखील मिळते. आधीच ‘वेल सेटल्ड’ असलेल्या आमदारांना इतक्या सुख-सुविधा, भत्ते कशाला? शासनाने आमदारांना मिळणारे वेतन, भत्ते बंद करावेत, सवलतीही देऊ नये.-गजानन पांडे, वर्धा. 

 

टॅग्स :state transportएसटीministerमंत्री