शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी वाळल्या संत्राबागा खरिपाकरिता मजुरांकडून काढणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:10 IST

मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देकारंजा तालुका : आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. वाळलेल्या संत्रा व बागायतधारकांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे.कारंजा तालुक्यात संत्रा बागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या संत्रा बागा जीवनाचा आधार ठरत होत्या. परंतु, यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत वाढलेले तापमान, त्यामुळे झळांच्या प्रमाणात झालेली वाढ व लांबणीवर पडलेला पावसाळा यामुळे अधिक प्रमाणात संत्रा बागा वाळल्या आहेत.त्या वाळलेल्या बागा काढल्याशिवाय खरीप पिकांची लागवड करता येत नाही. त्यामुळे आर्थिक झळ सोसून संत्रा बागांची काढणी करून धुऱ्यावर ढीग लावल्या जात आहे. तालुक्यात सगळीकडे बागा वाळल्याने सरपणालाही कुणी तयार नाही. त्यामुळे बागायतदारांनी सरपणाचे ढीग धुºयावर रचून ठेवल्याचे दिसत आहेत. संत्रा बागा तयार करण्यासाठी सहा-सात वर्षांचा काळ लागतो. तसेच त्या जमिनीतून अल्प उत्पन्न हाती येत असते आणि यावर्षीच्या दुष्काळाने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्याने जड अंतकरणाने बागांवर जेसीबी चालवावा लागला. त्यामुळे बागायतदार हताश झाले आहेत. आधीच निसर्गरूपी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी वर्गाला शासनाने आर्थिक मदत देऊन बागायतधारकांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.माझ्या शेतात ७०० संत्रा झाडे होती. त्यांना तयार करण्यासाठी ७ वर्षे लागली. परंतु विहिर कोरडी झाल्याने सर्वच्या सर्व झाडे वाळली. ती झाडे काढण्यासाठी ३५ हजार रूपये खर्च करावा लागला, अशा दुहेरी संकटात सापडले आहे. आम्हाला शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.- मधुकर हिंगवे, बागायतदार, सेलगाव (लवणे).

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती