शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

चित्रफीत तयार करणाऱ्यास ठोकल्या बेड्या; अटक आरोपी संख्या झाली तीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या राजेश याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून याला अटक केली. तर आता याच प्रकरणातील सहआरोपी असलेल्या आणि मारहाणीची चित्रफीत तयार करणाऱ्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात आष्टी पोलिसांनी आरोपी राजेश ठाकरे तसेच सहआरोपी म्हणून पोलीस अंमलदार विनायक घावट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, शिवाय पोलीस अंमलदार विनायक घायवट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आष्टी तालुक्यातील अंतोरा येथील एका तरुणाला त्याच गावातील स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता राजेश ठाकरे याने थेट आष्टी पोलीस ठाण्यात ‘सुंदरी’ (पोलीसी प्रसादासाठी वापरण्यात येणारा पट्टा)ने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या राजेश याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून याला अटक केली. तर आता याच प्रकरणातील सहआरोपी असलेल्या आणि मारहाणीची चित्रफीत तयार करणाऱ्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात आष्टी पोलिसांनी आरोपी राजेश ठाकरे तसेच सहआरोपी म्हणून पोलीस अंमलदार विनायक घावट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, शिवाय पोलीस अंमलदार विनायक घायवट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी केलेल्या सखोल तपासात या प्रकरणाचा व्हिडिओ किनाळा येथील गजानन आंबेकर नामक व्यक्तीने तयार केल्याचे पुढे आल्याने त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता राजेश ठाकरे याने गजानन याला मोबाइलमध्ये चित्रफीत तयार करावयास लावली होती, असे चौकशीत पुढे आल्याने गजानन आंबेकर याला अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्यात ‘विनायक’ची भूमिका महत्त्वाचीच

- सराईत असो वा गुन्हेगारी जगतात नव्याने एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पोलीस स्टेशन म्हटले की धामच फुटतो; पण चक्क पोलीस ठाण्यातच पोलिसांच्या ताब्यात राहणाऱ्या ‘सुंदरी’ने तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असली, तरी या संपूर्ण घटनेत अंतोराचे बीट अंमलदार विनायक घावट त्याची भूमिका महत्त्वाचीच राहिली आहे. विशेष म्हणजे पीडित तरुणाला पोलीस कर्मचारी विनायक यानेच पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर दमदाटी करून त्याला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता राजेश ठाकरे याच्या हवाली करण्यात आल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. 

ठाणेदार गेले होते शेतीचा वाद सोडवायला-    या घटनेच्या वेळी आपण अंतोरा गावातीलच शेतकरी केचे आणि खान यांच्यात सुरू असलेला शेतीचा वाद या प्रकरणात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी गेलो होतो, असे आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगितले असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे