शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एल्डर लाइन’चा सव्वा लाख ज्येष्ठांनी घेतला मानसिक आधार; तातडीने मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 06:39 IST

मानसिक आधारासह तातडीच्या मदतीसाठी १२ तास टोल फ्री हेल्पलाइन

महेश सायखेडे

वर्धा - ज्येष्ठांच्या विविध समस्या निवारणासाठी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने १ ऑक्टोबर २०२१ ला १४५६७ ही हेल्पलाइन (एल्डर लाइन) सुरू केली आहे. हीच एल्डर लाइन आतापर्यंत महाराष्ट्रातील तब्बल सव्वा लाख गरजू ज्येष्ठांसाठी आधारदायी ठरली आहे.

महाराष्ट्रात ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाइन जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. संबंधित हेल्पलाइन टोल फ्री असून, सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत कर्तव्यावर असलेला कर्मचारी प्रत्येक कॉल स्वीकारून गरजू ज्येष्ठ व्यक्तीला तातडीची मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करतो. दिवसभरातील प्रत्येक कॉल रेकॉर्ड होत असून, सकाळी कर्तव्यावरील कर्मचारी ते ऐकतो. त्यानंतर तातडीने कार्यवाही करीत असल्याचे सांगण्यात आले.

ज्येष्ठ व्यक्तीला मानसिक आधार, तातडीने मदत हेल्पलाइनवर कॉल करणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला कर्तव्यावर असलेला कर्मचारी मानसिक आधार देत आरोग्यविषयक सुविधा, कौटुंबिक छळ प्रकरणात तातडीची मदत, केअर सेंटरद्वारे देण्यात येणारी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो.

वर्षभरात चारच सुट्ट्याहेल्पलाइनद्वारे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षातून १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर आणि १ मे या चारच सुट्ट्या मिळतात.

एल्डर लाइन म्हणजेच ज्येष्ठांची राष्ट्रीय हेल्पलाइन. याद्वारे मागील दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील सुमारे सव्वा लाख ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यात आली आहे. १४५६७ या हेल्पलाइनच्या माध्यमातून ज्येष्ठ व्यक्तीला मानसिक आधार देत आरोग्यविषयक सुविधा, कौटुंबिक छळ प्रकरणात तातडीची मदत, केअर सेंटरद्वारे देण्यात येणारी सुविधा आदी मिळवून दिली जाते - जयदेव नाईक, विश्वस्त व प्रकल्प समन्वयक