शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:38 IST

ऑनलाईन लोकमतदेवळी : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याकरिता कृषी विभागाने मदत कक्ष स्थापन करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे पूर्ण करावेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देशही खा. रामदास तडस यांनी दिले.जिल्हातील सर्व तालुक्यांत अनेक गावांना रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा तडाखा बसला. ...

ठळक मुद्देरामदास तडस : देवळी व आर्वी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

ऑनलाईन लोकमतदेवळी : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याकरिता कृषी विभागाने मदत कक्ष स्थापन करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे पूर्ण करावेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देशही खा. रामदास तडस यांनी दिले.जिल्हातील सर्व तालुक्यांत अनेक गावांना रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा तडाखा बसला. रबी व खरीप तसेच फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीची पाहणी मंगळवारी सकाळी खा. रामदास तडस यांनी केली. यावेळी देवळी तालुक्यातील नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव), शेंदरी, इंझाळा, तळणी, शिरपूर, कोटेश्वर या गावांमध्ये प्रत्यक्ष खा. तडस यांच्यासोबत जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, दीपक फुलकरी, मिलिंद भेंडे, युवराज खडतकर, शंकर उईके, स्वप्नील खडसे, तलाठी राऊत , गजानन राऊत, नितीन होले, गजानन तिवरे, भीमराव नागपुरे, ज्ञानेश्वर टिपले, प्रवीण लोखंडे यांनी भेट दिली.रविवारी दुपारी व सोमवारी पहाटे तथा रात्री पावसाने चांगलाच कहर केला. देवळी तालुक्यातील पुलगाव, नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव), शेंदरी, इंझाळा, पिंपळगाव, वडाळा, सोरटा, सालफळ, मार्डा, तांभा, निमगव्हाण, मुरदगाव, सोनेगाव, दिघी, अडेगाव, बोपापूर तर आर्वी तालुक्यात खरांगणा, मोरांगणा, पिंपळखुटा, विरूळ, रसुलाबाद, रोहणा यासह अन्य गावांतही मोठ्या प्रमाणात गारपीट झाले. गारपीट व वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्या. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन असल्याने पिकेक नेस्तनाबूत झालीत. या गारपिटीमुळे शेतकरी पूरता अडचणीत आला आहे. पावसामुळे शेतातील कापूस ओला झाला. शिवाय फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याप्रसंगी खा. तडस यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दूरध्वनीवरून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावातील नुकसानाचे त्वरित पंचनामे करावे. शेतकऱ्यांना प्राथमिक मदत मिळवून द्यावी, अशा सूचना दिल्या. शिवाय तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी सहायक व तलाठी यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आलेत.आठ गावांत प्राथमिक सर्वेक्षणमंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहायकांनी मंगळवारी शेंदरी, सोनोरा, कांदेगाव, घोडेगाव, नाचणगाव, कोळोणा, पुलगाव, दहेगाव येथील नुकसानग्रस्त भागाचे प्राथमिक सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे.

टॅग्स :Rainपाऊस