शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:47 IST

एक आठवड्यापासून शेतकऱ्यांमध्ये धडकी भरविणारा पाऊस आणि गारपिटीने अखेर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठेही गारपिटीचे वा मुसळधार पावसाचे वृत्त नव्हते; पण सोमवारी सायंकाळनंतर सर्वत्र मुसळधार पावसासह गारपीट झाले.

ठळक मुद्देगारपिटीमुळे भाजीपाला नष्ट, झाडही कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एक आठवड्यापासून शेतकऱ्यांमध्ये धडकी भरविणारा पाऊस आणि गारपिटीने अखेर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठेही गारपिटीचे वा मुसळधार पावसाचे वृत्त नव्हते; पण सोमवारी सायंकाळनंतर सर्वत्र मुसळधार पावसासह गारपीट झाले. परिणामी, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूरता गारद झाला आहे. खासदारांनी नुकसानाची पाहणी केली असली तरी शासकीय सुटी असल्याने प्रशासन निद्रीस्तच दिसून आले.काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी धास्तावले होते. काहींनी दक्षता घेत तुरीच्या पेट्या झाकून ठेवल्या; पण शेतातील पिकांचे रक्षण कसे करावे, हा प्रश्नच होता. रविवारी आलेल्या पावसामुळे फारसे नुकसान झाले नव्हते; पण सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे कापून ढीग मारून ठेवलेल्या तुरीसह शेतातील पिकांचीही धुळधान झाली. खरांगणा (मो.) परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाले. यानंतर देवळी-पुलगाव तालुक्यात मुसळधार पावसासह गारपिटीने धुमाकूळ घातला. लिंबाच्या आकाराची गार पडल्याने शेतातील कुठलेही पीक वाचू शकले नाही. गहू जमिनीवर लोळला असून चण्याचेही प्रचंड नुकसान झाले. गारपिटीमुळे गव्हाचे पीक नेस्तनाबूतच झाले असून उत्पादन झाले तरी त्या गव्हाला कुणी विचारणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हरभरा जमिनीवर आडवा झाल्याने तो वाळू देत सवंगणी करणे याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुसळधार पावसामुळे शेतात गंजी लावून ठेवलेल्या तुरीही हाती येणार की नाही, ही शंकाच आहे. सर्वत्र पाण्याचे लोट गेल्याने झाकलेल्या ढीगातील तुरीचे उत्पन्नही कमी होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.सोमवारी देवळी, आर्वी तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे जमीन शुभ्राच्छादित झाली होती. वर्धेतील रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गारपीट झाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या गारपिटीमुळे शेतकºयांसह सामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील कवेलू फुटलेत. अनेकांच्या घरांची पडझड झाल्याचेही सांगण्यात आले आहे. असे असले तरी मंगळवारी प्रशासनाकडे किती व काय नुकसान झाले, याबाबत आकडेवारी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.गारपिटीमुळे भाजीपाला नष्ट, झाडही कोसळलेमुसळधार पाऊस आणि तुफान गारपिटीमुळे विरूळ (आकाजी) परिसरात भाजीपाला पिके पूर्णत: धुळीस मिळालीत. पालक, मेथीची शेती गारपिटीमुळे नष्ट झाल्याचे दिसून येत होते.शिवाय दाणापूर, ब्राह्मणवाडा, खैरवाडा येथे गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भाजीपाला पिके जमिनीवर लोळली तर मोठी झाडेही उन्मळून पडल्याचे दिसून येत होते.रबी पिकांना फटकादारोडा - सोमवारी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चना, गहू, कापूस, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे घराची छप्परे उडाली. झाडे तुटून पडली. दारोडा येथील मोटघरे यांच्या घराचे टिनाचे छप्पर गावातील रस्त्यावर येऊन पडले. यात कुठलीही प्राणहाणी झाली नाही. पशू, पक्षी मृत झाल्याचे दिसून आले. गारपीट व वादळ १० ते १५ मिनिटपर्यंत सुरू असल्याने फारसे नुकसान झाले नाही; पण शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पिके नष्ट झाल्याने शेतकरी चिंतातूर दिसून येतो. अनेक गावांना वादळी पावसाचा फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले.वादळी पाऊस व गारपीटसेलगाव (लवणे) - दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास परिसरात वादळी पाऊस व बोराच्या आकाराचे गारपीट झाले. यामुळे संत्रा, गहू, हरभरा पिकांना फटका बसला आहे. वादळामुळे शेतात झाकून असलेल्या तुरीच्या गंजीवरील ताडपत्र्या उडाल्याने संपूर्ण ढीग ओले झाले. वादळामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडालीत. निसर्गाच्या प्रकोपामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे.पंचनामे करीत तात्काळ मदत द्या -रणजीत कांबळेराज्याच्या अनेक भागासह जिल्ह्यात वादळ व गारपिटीमुळे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी. अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, किमान बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत तरी जाहीर करावी, अशी मागणी आ. रणजीत कांबळे यांनी केली आहे. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात अनेक ठिकाणी वादळ व गारपिटीने थैमान घातल्याच्या तक्रारी आहेत. यात तिघांचा बळी गेला असून कांदा, हरभरा, गहू आदी रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिके बाधित झाली असून कापणी केलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातही वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याचे चित्र आहे. या नुकसानाची त्वरित मोका पाहणी करण्याची मागणी आम्ही केली होती. शासनाने आदेशही दिले आहेत. नुकसान झालेली घरे, शेती, पशूधन आदींचा आढावा घेत भरीव मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही आ. रणजीत कांबळे यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस