शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींनी अद्ययावत करावा पोषण आहाराचा अभिलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 23:49 IST

शालेय पोषण आहार योजनेत गैरप्रकार होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही जि.प.च्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेत सुसूत्रता व पारदर्शकता यावी तसेच सध्याची जिल्ह्याची काय परिस्थिती आहे याची माहिती कळावी या हेतूने...

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना : त्रुट्या आढळल्यास कारवाई

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शालेय पोषण आहार योजनेत गैरप्रकार होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही जि.प.च्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेत सुसूत्रता व पारदर्शकता यावी तसेच सध्याची जिल्ह्याची काय परिस्थिती आहे याची माहिती कळावी या हेतूने जि. प. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी यांनी एक आदेश निर्गमित करून सर्व शिक्षकांना कुठल्याही परिस्थितीत ५ आॅगस्टपर्यंत शालेय पोषण आहार संदर्भातील शाळास्तरावरील अभिलेख अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या पत्रानुसार शिक्षकांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राप्त तांदुळ व अन्य धान्याची योग्य प्रकारे साठवण आणि संबंधित नोंदवहीतमध्ये नियमित नोंद घेणे, प्रत्यक्ष साठा व नोंदवहीत नोंदविलेला साठा यामध्ये तफावत नसल्याची खात्री करणे क्रमप्राप्त आहे. शालेय पोषण आहार योजनेसंबंधीची रोखवही व बँक पासबुक अद्ययावत करणे गरजेचे आहे. शिवाय खर्चाच्या पावत्या योग्य पद्धतीने नस्तीबद्ध आहे किंवा नाही याची शहानिशा करणे गरजेचे आहे. तांदुळ व धान्याचा पुरेसा साठा आहे किंवा नाही, कमी असल्यास तात्काळ शालेय पोषण आहारच्या अधीक्षकांना अवगत करून तात्काळ आवश्यक उपाय-योजना करणे गरजेचे आहे. स्वयंपाक घर मध्यान्ह भोजनासाठी वापरण्यात येणारी भांड्याची स्वच्छता ठेवण्याबाबत कळविणे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच शिल्लक धान्य योग्य प्रकारे साठविले आहे काय याची शहानिशा करून त्याचा अहवाल सादर करणे क्रमप्राप्त आहे. तसेच स्वयंपाकी व मदतनीस यांची वैद्यकीय तपासणी केली असल्याची खात्री करून घेत त्यांनी वैद्यकीय तपासणी केली नसल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. शिवाय त्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र गोळा करून ते अहवालात नमुद करावयाचे आहे. स्वयंपाकी व मदतनीस यांच्याकडे मुख्याद्यापकांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र आहे की नाही याची शहानिशा करून ते उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त नोंदवहीत असल्याची खात्री करावयाची आहे. विद्यार्थ्यांना पुरक आहार, स्नेहभोजन दिल्याबाबतचीही माहिती ठेवल्याची खात्री करण्यासह विद्यार्थ्यांची उपस्थितीती आॅन लाईन नोंदविणे क्रमप्राप्त आहे. सदर माहितीसह आदी माहिती वेळीच अद्यायवत करून संबंधितांना न पाठविल्यास शिक्षकांवर नियमानुसार कार्यवाही होणार आहे. शिवाय पंचायत राज समितीच्या दौºया दरम्यान ही या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. सदर पत्र सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.अवघे काही तासच शिल्लकजि.प. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी अभिलेख अद्ययावत करण्यासाठी रविवार ५ आॅगस्टपर्यंत मुदत दिली आहे. या पोषण आहार अभिलेखात तुट्या आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांच्या अडचणीत भर पडली आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण