शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

झाडावर चढल्याने बचावला गुराखी

By admin | Updated: September 11, 2014 23:45 IST

गुरे चारत असलेल्या गुराखाच्या अंगावर दुपारी १२ च्या सुमारास अस्वली धावल्या. जीव वाचविण्याकरिता सदर गुराखी झाडावर चढला़ हे पाहून अस्वलांनी चक्क झाडाखालीच ठिय्या मांडला़ रात्री ९ वाजता

नऊ तासांनी झाली सुटका : अस्वलाचे पिलांसह झाडाखाली ठाणतळेगाव (श्या.पंत.) : गुरे चारत असलेल्या गुराखाच्या अंगावर दुपारी १२ च्या सुमारास अस्वली धावल्या. जीव वाचविण्याकरिता सदर गुराखी झाडावर चढला़ हे पाहून अस्वलांनी चक्क झाडाखालीच ठिय्या मांडला़ रात्री ९ वाजता ग्रामस्थ व वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून अस्वलींना पिटाळून लावले़ यामुळे तब्बल ९ तासांनी गुराख्याची झाडावरून सुटका होऊ शकली़ ही घटना मंगळवारी तळेगाव वनक्षेत्रातील पांजरा शिवारात घडली. नऊ तासानंतर सुटका झालेल्या गुराख्याचे नाव अशोक नेहारे असे असून तो आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी या गावचा रहिवासी आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तो गुरे घेऊन पांजरा जंगलात चारण्याकरिता गेला होता. त्या भागात गत काही महिन्यांपासून अस्वलांसह अन्य हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ सुरू असल्याची चर्चा होती. त्याकडे कुणीही लक्ष दिले नव्हते़ या भागात गुरे चारण्यावर बंदी आहे. असे असताना अशोक सकाळी ९ च्या सुमारास घनदाट जंगलात पोहोचला. दरम्यान, दोन मोठ्या अस्वली व त्यांचे दोन बछडे त्याच्या मागे लागले. काय करावे कळत नसल्याने त्याने उंच झाडावर चढणे पसंत केले. काही वेळाने अस्वली निघून जातील, असे त्याला वाटले; पण अस्वलाने बछड्यांसह झाडाखाली तळ ठोकला. यामुळे अशोकने जवळ असलेल्या मोबाईलवरून घडलेला प्रकार गावातील काही व्यक्तींना कळविला. सोबतच खानवाडी येथील वनसमितीचे अध्यक्ष गुणवंत सालोकार यांनाही याबाबत माहिती दिली़ यानंतर सदर घटना तळेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी वनीकर यांना सांगताच ते वन कर्मचारी इंगळे तसेच वर्धमनेरी व खाणवाडी येथील ग्रामस्थांसह रात्री ८ वाजताच्या सुमारास पांजरा जंगलात पोहोचले़ अशोक कोणत्या झाडावर बसून आहे, हे कळत नव्हते. शेवटी अशोकच्या भ्रमणध्वनीवर ग्रामस्थांनी संपर्क साधला. जंगलात प्रचंड आरडाओरड करण्यात आली. शेवटी अशोकचा पत्ता लागला. नऊ तास उलटले असतानाही अस्वली बछड्यांसह झाडाखालीच बसून होत्या. ग्रामस्थांना अस्वलींना हुसकावून लावले़ यानंतर अशोक झाडावरून खाली उतरला़ रात्री ९ वाजता अखेर त्याची सुटका झाली आणि जंगलातील थरार संपला.(वार्ताहर)मोबाईल नसता तर...जंगलात गुरे चारण्याकरिता गेलेल्या अशोककडे मोबाईल नसता तर त्याला मदत मिळाली असती काय, त्याच्यासोबत घडलेली घटना ग्रामस्थांसह वन अधिकाऱ्यांना कळली असती काय, असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित झाले. अशोककडे भ्रमणध्वनी संच असल्याने त्याला जीवनदान मिळाले़ जंगलालगतच्या शेत मालक व मजुरांमध्ये यामुळे भीती पसरली आहे़