शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

८५० किमीच्या वर्धा-कराड प्रवासाला मारूती चितमपल्लींकडून हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 2:06 PM

पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त सायकलने भ्रमंती करावी असा संदेश देणाऱ्या ८५० किमीच्या वर्धा-कराड या सायकल यात्रेचा शुभारंभ पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.

ठळक मुद्देबहारचा उपक्रम सायकल रॅलीतून पक्षी संवर्धनाचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्षी संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे. इतकेच नव्हे तर शाळकरी मुला-मुलींमध्ये पक्षीप्रेम निर्माण केले पाहिजे. तसेच पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त सायकलने भ्रमंती करावी असा संदेश देणाऱ्या ८५० किमीच्या वर्धा-कराड या सायकल यात्रेचा शुभारंभ पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. ही सायकल यात्रा बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. सदर सायकल स्वार कराड येथे आयोजित दुसऱ्या अ.भा. आणि ३२ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात सहभागी होणार आहेत.कराड येथे २३ व २४ नोव्हेंबरला पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात बहार नेचन फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वर्ध्यातील पक्षी मित्र सहभागी होणार आहेत. या संमेलनात सहभागी होणाºया वर्धेच्या पक्षी प्रेमींनी समाजाला पक्षी संवर्धनाचा संदेश देण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बहार नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक तसेच बहारचे सचिव दिलीप वीरखडे हे वर्धा ते कराडपर्यंतचा प्रवास सायकलने करणार आहेत. ते शनिवारी कराडच्या दिशेने रवाना झाले आहे. या सायकलवारीला अरण्य ऋषी तथा पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी संजय इंगळे तिगावकर, डॉ. जयंत वाघ, पराग दांडगे, स्नेहल कुबडे, विनोद साळवे, रवींद्र पाटील, राहुल तेलरांधे, बाबाजी घेवडे, दीपक गुढेकर, मुरलीधर बेलखोडे, बी. एस. मिरगे, राजेंद्र लांबट, कौशल मिश्रा, अजय तिगांवकर, जयंत सबाने, वैभव देशमुख, अविनाश भोळे, राहुल वकारे, दर्शन दुधाने, सारांश फत्तेपुरिया, राजेंद्र लांबट, ज्योती तिमांडे, प्राजक्ता वीरखडे, डॉ. स्वाती पाटील, अनघा लांबट, पार्थ वीरखडे आदींची उपस्थिती होती.

सहा दिवसांचा प्रवासवर्धेवरुन निघालेली ही सायकलवारी कारंजा, मेहकर, लोणार, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बारामती, सातारा, मार्गे कराडला सहा दिवसात पोहोचणार आहे. हे सायकलस्वार सहा दिवसांच्या कालावधीत एकूण ८५० किमीचा प्रवास करणार आहे. हे सायकलस्वार ठिकठिकाणी थांबून निसर्ग प्रेमींशी संवाद साधणार आहेत.असा राहणार प्रवास१७ नोव्हेंबरला वर्धा ते कारंजा १३६ किमीचा प्रवास१८ नोव्हेंबर कारंजा-मालेगाव-मेहकरपर्यंतचा ११० किमीचा प्रवास१९ नोव्हेंबर मेहकर-लोणार-सिंदखेडराजा-जालनापर्यंतचा १२५ किमीचा प्रवास२० नोव्हेंबर जालना-औरंगाबाद-अहमदनगरपर्यंतचा १७६ किमीचा प्रवास२१ नोव्हेंबर अहमदनगर-दौंड-बारामतीपर्यंतचा १४९ किमीचा प्रवास२२ नोव्हेंबर बारामती-सातारा-कराडपर्यंतचा १३७ किमीचा प्रवास

टॅग्स :Socialसामाजिक